बटाटयाची भाजी : maharashtrian recipe in marathi
साहित्य :-
१) बटाटे चार , लाल टमाटा एक
२) कांदा एक , लसूण एक
३) खोबरं पाव वाटी
४) धने एक चमचा
५) तेल , चवीपुरतं मीठ
६) कोथिंबीर अर्धी वाटी
७) लाल मिरच्या सहा
८) खडा किंवा गरम मसाला दोन चमचा
९) आलं एक इंच
१०) अर्धा लिटर गरम पाणी .
कृती :-
१) बटाटे तीन पद्धतीनं भाजीत टाकता येतात – १) उकडून , सोलून , मोठे तुकडे करून २) कच्चे बटाटे सोलून त्याचे चौकोनी तुकडे करून ३) कच्चे बटाटे सोलून वेफर्ससारख्या खूप जाड गोल चकत्या करून .
२) कांदा-खोबरं , धने , मिरच्या , खडा मसाला तव्यावर तेल टाकून क्रमाक्रमानं भाजून घ्यावं .
३) भाजलेला मसाला , लसूण , आलं , थोडंसं पाणी टाकून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावं .
४) फोडणीसाठी तेल कडक करून हळद , मसाला परतावा .
५) चांगला वास सुटल्यावर बटाटे , टमाटा टाकावा . मीठ , कोथिंबीर , गरम पाणी टाकावं .
६) कच्चे बटाटे असल्यास दहा मिनिटं व उकडलेले असल्यास पाच मिनिटं मंद आचेवर भाजी शिजू दयावी .
RELATED POSTS
maharashtrian recipes in marathi
maharashtrian recipes
maharashtrian food
maharashtrian recepies
maharashtrian recipies
maharashtrian non veg recipes in marathi
maharashtrian recipe
maharashtrian recipe in marathi
recipe maharashtrian dishes
indian maharashtrian recipes