BREAKING NEWS

< >

marathi friendship

 

मैत्री ही मोठी अजब चीज आहे.

कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात.

कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही.

अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते.

हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो.

 

एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो.

'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला.

निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात.
प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो

 

Searches related to marathi friendship

marathi friendship greeting card

marathi friendship kavita

marathi friendship scrap

marathi friendship messages

marathi friendship shayari

marathi friendship greetings

free marathi friendship sms

marathi friendship poem

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS