BREAKING NEWS

< >

marathi goshti

 

चटका बसला,ठेच लागली , फटका बसला तर "आई गं !" हा शब्द बाहेर पडतो पण रस्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा "बापरे!"हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतंय ना?

कोणत्याही मंगलप्रसंगी घरातील सर्वजण जातात , पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जात नसतो.पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो.तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा बापच जागा असतो.मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप , मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप , घरच्यांसाठी स्वत:च्या व्यथा दडवणारा बाप...खरंच किती ग्रेट असतो ना?

वडिलांचं महत्व कोणाला कळतं? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदार्‍या खूप लवकर पेलाव्या लागतात त्यांना एकेका वस्तुसाठी तरसावं लागतं. वडीलांना खर्‍या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातली मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो.ती अनेक प्रश्न विचारते.कोणतीही मुलगी स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते.मुलगी बापाला जाणते. जपते.इतरांनीसुद्धा असंच आपल्याला जाणवं हीच बापाची किमान अपेक्षा असते.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS