BREAKING NEWS

< >

marathi rashi bhavishya November 2014

 

राशी भविष्य नोव्हेंबर २०१४

 

मेष: आपण साहस , दृढता आणि विश्वास  याने परिपूर्ण राहाल . नवीन  उत्पाद , नवी  परियोजना कलाकृती , पुस्तक , संगीत रचना , कविता याकरिता  हि वेळ आदर्श आहे . मिडिया, प्रचार , लेखन , कॉपीराईट, इंटरनेट क्षेत्रातील  व्यक्तींना फायदा होईल . पारिवारिक पक्ष , संपत्ती, घर आदि  महत्त्वपूर्ण राहील . भौतीकतेपासून दूर अध्यात्म जीवन व्यतीत करणे  पसंत कराल.

 

 

वृषभ: निश्चित रूपाने फायदा मिळेल . दोस्त आणि परिजन यात  फायदेशीर देवान-घेवाण  होईल. प्रेम रोमान्स  यांचा विशिष्ट अनुभव देईल . पैशाची आवक सुरु राहील . आपणा करिता हा काळ भाग्यशाली आहे. आर्थिक क्षेत्रात जिथे प्रयत्न कराल तिथे सोन्यासारखे यश प्राप्त होईल . भावनात्मक आणि अध्यात्मिक क्षेत्रात  गतिविधि वाढेल. तंत्र-मंत्र आणि  अलौकिक गतीविधीकडे  आकर्षिले जाल. यात्रा संभवते .

 

 

मिथुन: आर्थिक हालचाल जास्त अनुभवास येईल . योग्य ठिकाणी निवेश कराल . बोनस मिळण्याची शक्यता . आपसी संबंधात निराशा , संभव, स्वास्थ्य ठीक राहील . प्रवास करावा लागेल . अथवा मनोरंजन , मौज -मस्तीकारिता  सुटीघेऊ शकता . पारिवारिक  जबाबदारीबद्दल गंभीर असाल . मानसिक शांती आणि योग क्रिया  या करिता चिंता मुक्त असणे आवश्यक.

 

 

कर्क: हा महिना विरोधाभास  युक्त असेल . परंतु तणाव कमी राहील . उत्तराधिकार , संपत्ती , वसियत यात लाभ संभवतो . जुने मित्र मदत करतील . त्यांनी दिलेला कायद्याविषयी सल्ला लाभदायक आहे . यात्रा आणि बदलावाचा योग आहे . सामाजिक बाबतीत क्षेत्र वाढवावे लागेल .

 

 

सिंह: नवीन चंद्रमा  विविध क्षेत्रात विशेषत: व्यवसायात  वृद्धी करेल . सामन रुपात शुभ अवसर येतील . नवीन लोक नवे प्रोजेक्ट, नवे संपर्क , नवे सौदे  यातील काही गोष्टीमुळे आपणास प्रेरणा मिळेल. स्वत: आणि इतराकरिता  कठीण परिश्रम कराल -प्रयत्न चालू ठेवा . मनातली भीती , विचित्र  भाव यावर  मत करण्याचा प्रयत्न करा .

 

 

कन्या: गुंतागुंतीच्या आणि निरास कामात सफलता मिळेल . अधिक पैसा मिळविण्यात यश येईल . प्रेम व प्रणय  या क्षेत्रात प्रगती होईल . प्रार्थना, धर्म, पूजा-पाठ , तंत्र-मंत्र  यात विश्वास वाढेल . सामाजिक  स्वरूप प्रसिध्द व्हाल. सामर्थ्याबाहेर  कामामुळे थकवा येईल . पैसा मिठास आणेल . मोठा खर्च  संभव.

 

 

तुला: आपल्या कामात रचनात्मकता  वाढीबद्दल  आपण हर संभव प्रयत्न कराल . प्रियजन व अतिष्ट यांच्याशी जवळीक वाढेल . आपणाकरिता सुखद व उत्तम  समय आहे . चिंता,जबाबदारी  या पासून मुक्तीचा  अनुभव होईल . प्रिय व्यक्तीबरोबर प्रेमालाप , उचित समय  आणि हसी-खुशीची इच्छा होईल . आव्हान मिळेल ज्यामुळे फायदाच फायदा  व प्रगतीचा अवसर मिळेल . स्वत:ला स्थापित कराल.

 

 

वृश्चिक: आर्थिक काळजी दूर होईल . मागील दोन महिन्यापासून  ज्या निराशापुर्व  अवस्थेत होता  ती परिस्थिती आता दूर होईल . हा काळ बुद्धिमत्तापूर्ण  निवेश करावयाचा आहे . त्यामुळे आपले इन्कम वाढू शकते . व्यावसायिक आणि खाजगी  क्षेत्रातील  लोकांना आपण  संतुष्ट करण्यात सफल व्हाल . इन्कम संबंधित योजनांना प्राधान्य द्याल . त्यामुळे जबरदस्त परिवर्तनांचा योग आहे.

 

 

धनु: राहत आणि मन:शांती  अनुभवास येईल . सिद्धांतवादी व व्यापक दृष्टीकोन असेल . उपलब्धी प्राप्त होईल . स्वप्नातील अपेक्षा साकार होऊ शकता. विदेश आणि दूर -दूरच्या लोकांशी संपर्क होईल . लांबलचक  व्यवसाय  आणि विदेशाशी व्यापार  या बद्दलच्या  संभावना शोधाल . वडिलोपार्जित संपत्ती मिळेल . आरोग्याकडे लक्ष असू द्या . अधिकाधिक प्रगती करावयास  प्रयत्न कराल . पैसा उपलब्ध राहील.

 

 

मकर : या महिन्यात आपल्या डोक्यात  नवीन कल्पना येतील  त्यामुळे फायदा होण्याची शक्यता. आपल्या सीमित दुनियेकडे लक्ष जाईल . कारण मानसिक सुरक्षा  आणि आत्मविश्वास  प्राप्तीची इच्छा राहील . बदलत्या  परिस्थितीशी  ताळमेळ घालण्यात अडचण येईल .

 

 

कुंभ: आपली नवीन काही करावयाची उर्जा  व प्रतिभा  चरमावस्थेत राहील. धनाची आवक होत राहील . वारसहक्काने काही प्राप्ती संभव.  कामातून वेळ काढून मौज मस्ती कराल. प्रेम संबधात  सफलता,. भाग्य  साथ देईल . सर्व प्रकारची काळजी दूर होईल.

 

 

मीन: या अवधीत  नोकरी अथवा व्यवसाय यात चांगला स्कोप आहे . पारिवारिक वातावरण  चांगले असेल . दाम्पत्य संबंध मधुर राहील . इच्छा आकांक्षा पूर्ण होतील .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS