BREAKING NEWS

< >

mazi marathi

 

माझी मराठी....!

मराठी! महाराष्ट्र तसेच गोवा राज्याची अधिकृत राजभाषा होण्याचा मान माझ्या माय मराठीचा! मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. तब्बल नऊ कोटींच्यावर लोक मराठी भाषा बोलतात. लोकसंख्येनुसार मातृभाषा असणाऱ्यांच्या संख्येत मराठीचा जगात पंधरावा क्रमांक तर भारतात चौथा! महाराष्ट्राखेरीज गोवा, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, कर्नाटक, तामिळनाडू तसेच काही प्रमाणात गुजरात मध्येही मराठी भाषिक प्रदेश आहे. मराठी मध्ये अहिराणी, खानदेशी, मालवणी, माणदेशी, वऱ्हाडी आणि कोकणी ह्या बोलीभाषा देखील आढळतात. भारतीय राज्यघटनेच्या २२ अधिकृत भारतीय भाषांमध्ये मराठीचाही समावेश आहे. मराठी ही सातवाहनांची प्रशासकीय भाषा होती. तर, देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठीची भरभराट झाली. 

Mazi Marathi

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS