BREAKING NEWS

< >

mejwani recipes marathi

पेपर डोसा 

साहित्य :-

१)      तीन वाटया तांदूळ

२)      एक वाटी उडीदडाळ

३)      पाऊण वाटी तूरडाळ

४)      मुठभर पोहे , तेल

५)      दोन ते तीन चमचे आंबट दही

६)      चवीपुरते मीठ . 

कृती :-

१)      प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे .  पोहेसुध्दा भिजत टाकावेत .

२)      आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे .  त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे . 

३)      पीठ आंबल्यानंतर तवा गैसवर ठेऊन चांगला तापवावा .  त्याला थोडे तेल लावून त्यावर मिठाच्या पाण्याचा शिडकावा करावा . 

४)      नंतर त्यावर हे तयार मिश्रण पळीभरून सोडून वाटीने ते पसरावे व वर झाकण ठेवावे .  थोडया वेळाने डोसा आपोआप सुटून येईल . 

५)      त्याची गुंडाळी करावी व खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यास दयावा .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS