BREAKING NEWS

< >

modak recipe in marathi

 

उकडीचेमोदक

साहित्य: २ वाट्या तांदूळ पिठी, २ टेस्पून मैदा, २ वाट्या पाणी , तेल किंवा तूप  १ टेबलस्पून , चिमुटभर मीठ, २ वाट्या नारळ चव , १ वाटी गुळ , वेलचीपूड , तांदूळ पिठी, खसखस  १ टेबलस्पून भाजून, जाडसर पूड

 कृती: तांदूळ पिठी व मैदा चालून घ्यावं.  पाणी मोजून ठेवावे. नारळ चव, चिरलेला गुळ,मंद आचेवर शिज्वून् त्यात  मीठ चिमुटभर ,खसखस व तांदळाची १ टेस्पून  पिठी घालून उतरवावे. मधून मधून ढवळावे म्हणजे रावल सारण होईल. थंड होऊ द्यावे. मोजलेले पाणी , चवीला  मीठ  व लोणी   घालून पाण्याला उकळी आली की  तांदूळ पिठी व मैदा घालावा. ढवळून झाकण ठेवून दोन वाफा येऊ द्याव्यात . परातीत काढून पाण्याच्या हाताने उकड छान माळून घ्यावी.  लिंबाएवढा   गोळा घेवून  हातावर वाटी  करून  मध्ये किंचित  जाडसर ठेवून बाजूने पातळ दाबत दाबत  मध्ये सारण करावे. तेल पाण्याच्या हाताने  मुखऱ्या पडून मोदक बंद करावा. मोदक कुकरमध्ये किंवा  मोठ्या पातेलीत चाळणीवर  मलमलचा  कपडा  घालून वाफवावे.  जास्त प्रमाणात मोदक करायचे झाल्यास  ३ ४ वेळा करावे लागतात . नाहीतर गरम पाण्यात  उकडीचे भांडे ठेवून  गरम मोदक करावे . सारण म्हणून खवा  साखरेचे मिश्रण , आंब्याचा  मावा , खसखस चारोळी , बेदाणे घालून  साजूक तूप घालून  सारण करता येते.

तळणीचे मोदक

साहित्य:  १वाटी मैदा ,  १ वाटी  रवा , चिमुटभर मीठ,  ३ टेस्पून मोहनासाठी तेल ,दुध मैदा ,रवा  भिजण्यासाठी , ४ वाट्या नारळ चव , २ वाट्या गुळ, २ वाट्या साखर, वेलचीपूड , तेल तूप तळण्यासाठी .

कृती: मैदा , रवा  मीठ कडकडीत तेलाचे  मोहन घालून  दुधात घट्ट   भिजवावे . साखर , नारळ चव एकत्रं  करून  शिजवावे. वेलदोडे पूड घालावी . थोडया थोड्या वेळाने सारं ढवळावे . म्हणजे रवाळ होते.  मैदा तासभर भिज्ल्यावर  एकसारखे गोळे करून  पुर्या लाटून त्यात सारण भरून तोंड बंद करून  मोदक करावे . मंद आचेवर गुलाबी टाळावे. सारणात केशर , बेदाणे चारोळी इत्यादी घालून  स्वाद वाढवावा . खवा भाजून पिठीसाखर घालून  ते सारण वापरता येते . बाजरी खोबरे कीस किंवा खोबरयाच्या वाट्या किसून त्यात गुळ, पिठीसाखर इत्यादी घालून  मोदक करावे.

साच्यातील मोदक 

साहित्य: पाव किलो  खवा , पाव किलो पिठीसाखर, वेलचीपूड केशर, २ टेबलस्पून दुध पावडर , पाव वाटी दुध  कोमट असावे.

कृती: खवा मंद आचेवर परतवून थंड करावा . फार भाजू नये . त्यात कोमट दुध ,केशर , वेलचीपूड व पिठी साखर घालून  सारखे मळावे . त्यातच मिल्क पावडर घालावी . मिल्क पावडर कमी जास्त लागू शकते . मोदकाच्या साच्यात  घालून मोदक करावे . काजू पावडर व खवा , पिठ्साखर घालून  काजू मोदक करता येतात . आंब्याचा मावा , चॉकलेट पावडर ,टीनमधील  अननस  कोरडा करून  काहीही वापरून  वैविध्यपूर्ण मोदक बनवता  येतील.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS