BREAKING NEWS

< >

mumbai masala

 

 

1. गोडा मसाला - काळा मसाला........

साहित्य : अर्धी वाटी सुके खोबरे कीस,५ ते ६ तमालपत्रे,अर्धे जायफळ, अर्धा चमचा जायपत्री, हिंग, २ चमचे हरबरा डाळ,२ वाटी धणे, अर्धी वाटी तीळ,२ चमचे दालचिनी तुकडे,२ चमचे खसखस, २ चमचे जीरे,प्रत्येकी १ मोठा चमचा लवंग, काळी मिरी, वेलदोडे,८ ते १० मसाला वेलच्या,अर्धा चमचा नागकेशर,१ चमचा दगडफूल, तेल.

कृती : थोड्या तेलावर हिंग टाकुन सर्व मसाले परतुन बाजुला काढुन ठेवावे. शेवटी खसखस, खोबरे अन तीळ भाजुन परतुन मग सर्व एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करावे.

तुम्ही वाटल्यास याच्यात तीळ अन खोबरे, जायपत्री नाही घातले तरी चालेल, कारण नंतर या मसाल्याला तेल सुटु शकते.

अन तिखट अंदाजाने हवे तेवढ्यात मिसळुन हलवुन घ्या. ओला हात लागु द्यायचा नाही

 

2. गरम मसाला.

साहित्य : २०० ग्रॅम जीरे, ६० ग्रॅम धणे, ५० ग्रॅम मोठी वेलची, ५० ग्रॅम सुंठ पावडर, १ इंच दालचिनीचे साधारण १० ते १५ तुकडे, १५ ते २० ग्रॅम लवंग, २० गरम जायपत्री, २० ग्रॅम तेजपान, 1 1/2 जायफळ.

क्रुती : सर्व साहित्य थोडे थोडे गरम करुन मिक्सरमधुन बारीक करुन, चाळुन गार झाले की हवाबंद डब्यात भरावे.
 
 
3. केशरी दुधाचा मसाला.
साहित्य : २५ ग्रॅम बदाम, २५ ग्रॅम पिस्ते, १० वेलदोडे, अर्धे जायफळ, थोडी जायपत्री, थोडे केशर.

कृती : सर्व एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक पुड करावी व आयत्या वेळी गरम दुधात साखर अन थोडा यातील मसाला टाकुन द्यावे.
 
4. चाट मसाला

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS