BREAKING NEWS

< >

natrang marathi movie

 

नटरंग

२०१० साली प्रदर्शित झालेला रवी जाधव दिग्दर्शित ‘नटरंग’ हा तमाशातील एका ‘नाच्या’च्या जीवनाचा वेध घेणारा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला होता. चित्रपटातील पात्र ‘गुणा’ खरोखरच एक गुणी कलाकार. तमाशातील ‘राजा’ची मध्यवर्ती भूमिका साकारण्याच्या त्याला खूपच आवड असते. ही आवड पूर्ण करण्यासाठी तो स्वतःची नाटक कंपनीही उभारतो. ह्या नाटक कंपनीत जर नाच्या असेल तरच सामील होण्याची अट नर्तकी घालते. काही केल्या नाच्या न मिळाल्याने अंगपिडाने मजबूत असूनही गुण स्वताच ‘नाच्या’ची भूमिका साकारतो. मात्र, नाच्याची ही भूमिकाच त्याच्या जीवनाला विशेष कलाटणी देणारी ठरते. आनंद यादवांच्या ‘नटरंग’ ह्या कादंबरीवर आधारलेल्या ह्या चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी दर्जेदार अभिनय सदर केला आहे. त्यातही, अतुल कुलकर्णीने साकारलेला ‘गुणा’ आणि सोनाली कुलकर्णीचा ‘नृत्याविष्कार’ विशेष स्मरणात राहतो. विभावरी देशपांडे, प्रिया बेर्डे, किशोर कदम हे इतर कलाकार. ह्या चित्रपटाला अजय-अतुल ह्या मराठीतील आघाडीच्या संगीतकार जोडीने आपल्या दर्जेदार संगीताने संगीतबद्ध केले आहे. ह्या संगीताने लयबद्ध केलेली गाणीही ह्या चित्रपटाची जमेची बाजू.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS