BREAKING NEWS

< >

non veg chinese recipes

 

 

चिकन चिली फ्राय



साहित्य : चिकनचे साधारण ब्रेस्ट किंवा लेग्जचे ५-६ पिसेस, १ चमचा आल्याचा कीस, ६ लसून पाकळ्या ठेचून,
८ लाल मिरच्या, ४ अंडी, १/२ चमचा मिरपूड, १ वाटी ब्रेडक्रम्स (ब्रेड चा चुरा), तेल, १+१/२ चमचा मीठ, १ चमचा सोयासॉस.

कृती : एका सॉसपॅनमध्ये १/२ चमचा मीठ, सोयासॉस आणि १+१/२ वाटी पाणी घालावे. त्यात चिकनचे तुकडे
सुरीने खाच्या पाडून टाकावे व झाकण घालून शिजू ध्यावे.
दरम्यान लसून, आले, मिरच्या एकत्र वाटून घ्यावे. अंडी फोडून खूप खूप फेटून घ्यावे. शिजवलेले चिकनचे पिसेस घेऊन
त्याना वाटण लावावे व वरून उरलेले मीठ तसेच मिरपूड भुरभुरावी. ब्रेडक्रम्स मध्ये घोलावावे व अंड्यात बुडवून तळावे.

 

चिकन चिली ड्राय


साहित्य : २ वाटया चिकनचे बोनलेस तुकडे, २ कांदे, २ सिमला मिरची, ६-७ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून मीठ,
१ टीस्पून मिरीपावडर, १ टेबलस्पून सोया सॉस, १/४ टीस्पून अजिनोमोटो, १ टीस्पून कॉर्नफ्लोअर, तेल,
१ टीस्पून मैदा, दिढ टीस्पून साखर, एक अंड

वाटण : ७-८ लसूण पाकळ्या, १/२ इंच आले, ४-५ हिरव्या मिरच्या (सर्व जाडसर वाटावे.)

कृती : चिकनच्या तुकड्याना १/४ टीस्पून मिरी पावडर, कॉर्नफ्लोअर, मैदा, अंड, एक चिमुट अजिनोमोटो,
१/२ टीस्पून मीठ लावून अर्धा तास ठेवावे व कढईत तेल चांगले तापल्यावर चिकनचे तुकडे घालून मंद गॅसवर
लाल रंगावर तळून काढावेत. सिमला मिरची व कांदा उभा पातळ चिरावा व कांद्याच्या पाकळ्या सुटया कराव्यात.
मिरच्या उभ्या चिराव्यात. पॅनमध्ये २-३ टेबलस्पून तेल तापल्यावर वाटलेले आले, लसून, मिरची घालून
गुलाबी रंगावर तळावे व त्यावर चिरलेल्या मिरच्या, कांदा तळून व सिमला मिरची घालून परतावे.
नंतर त्यावर थोडे पाणी शिंपडावे व त्यात सोया सॉस, १/४ अजिनोमोटो, मिरीपावडर, १/४ टीस्पून मीठ,
साखर घालून परतून पाणी सुकवावे व नंतर त्यात तळलेले चिकनचे तुकडे घालून परतावे
व गरमा गरम सर्व्ह करावे.

 

 

सेजवान चिकन



साहित्य : १/२ किलो चिकन, ३-४ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून मीठ, २ चिमुट अजिनोमोटो,
२-३ टीस्पून साखर, २ टीस्पून टोबॅस्को सॉस, १/२ टीस्पून सफेद मिरीपावडर, १ टेबलस्पून
व्हीनीगर, १ टेबलस्पून सोया सॉस, एक टेबलस्पून वाईन, २-३ टीस्पून कॉर्नफ्लोअर,
दिढ टेबलस्पून तेल.

वाटण मसाला : १ इंच आले + १०-१२ लसूणपाकळ्या (सर्व जाडसर वाटावे.)

कृती : चिकनच्या तुकडयांना मीठ, साखर, व्हीनीगर, सोया सॉस, टोबॅस्को सॉस, वाईन
लावून ठेवावे. पातेलीत तेल तापल्यावर मिरची उभी चिरून टाकावी व सफेद होईपर्यंत परतावी.
नंतर त्यात सफेद मिरीपावडर घालावी. लाल झाल्यावर चिकन घालावी व परतावे.
मंद गॅसवर १०-१५ मिनिटे वाफेवर शिजवावे. चिकन शिजल्यावर १ वाटी पाण्यात कॉर्नफ्लोअर
मिसळून ते चिकनमध्ये ओतावे व उकळेपर्यंत ढवळत राहावे. उकळी आल्यावर ३-४ मिनिटांनी
गॅस बंद करावा.

 

चिकन मंचुरियन



साहित्य : २ वाटया चिकनचे बोनलेस तुकडे, दिढ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १/२ टेबलस्पून मैदा,
१ टीस्पून मीठ, १/२ टीस्पून मिरीपावडर, १/४ अजिनोमोटो, १ टीस्पून साखर, १ अंडे, १ कांदा,
अर्धी वाटी कांद्याच्या पाती चिरून, तेल, १ टेबलस्पून सोया सॉस, १/२ टेबलस्पून रेड चिली सॉस

वाटण : ६-७ लसूण पाकळ्या, १/४ इंच आले २-३ हिरव्या मिरच्या (सर्व जाडसर वाटावे.)

कृती : चिकनच्या तुकड्याना १/२ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १/२ टेबलस्पून मैदा, १ अंडे,
१/2 टीस्पून मीठ, एक चिमूट अजिनोमोटो, १/४ टीस्पून मिरीपावडर लावून तेलात तळून घ्यावे.
कांदा उभा पातळ चिरावा व कांद्याच्या पाकळ्या सुटया कराव्यात.
एक टेबलस्पून तेल तापल्यावर वाटलेले आले, लसूण, मिरची परतावे व त्यावर कांदा घालून
२-३ मिनिटे परतावा त्यावर थोडे पाणी घालून त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, अजिनोमोटो,
१/२ टीस्पून मीठ, साखर व चिरलेल्या कांद्याच्या पाती घालून चांगले उकळावे व त्यात चिकनचे तुकडे,
१ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून घालावे व उकळेपर्यंत ढवळावे.
२-४ मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करावा.

 

 

 

 

 

 

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS