BREAKING NEWS

< >

palak recipes in marathi

 

 पालकाची पातळ भाजी : palak recipes in marathi

 

साहित्य :-

१)      पालक एक जुडी

२)      तेल पाव वाटी , फोडणीचं साहित्य

३)      लाल सुक्या मिरच्या पाच-सहा

४)      लसणाच्या पाकळ्या पाच-सहा

५)      तिखट अर्धा चमचा

६)      सुपारीएवढा गुळ

७)      हरभरा डाळीचं पीठ अर्धी वाटी

८)      फोडणीचं साहित्य , चवीपुरत मीठ .  (मराठवाड्यात फोडणी करताना पाव चमचा मोहरी + पाव चमचा जिरं असं दोन्ही घालतात .)

कृती :-

१)      फोडणी करून त्यात चिरलेला पालक घालून तिखट , मीठ , साखर टाकून भाजी चंगली वाफवून घ्यावी .

२)      त्यानंतर दोन वाटी पाण्यात डाळीचं पीठ कालवून ते भाजीत घालावं .एक उकळी आणावी . 

३)      भाजी वाढण्याआधी ठेचलेला लसूण आणि सुक्या लाल मिरच्यांची वेगळी फोडणी करून ती भाजीवर घालावी .  यामुळं भाजी खूप खमंग लागेल .

४)      मराठवाड्यात पालेभाज्या करताना हरभरा डाळीचं पीठ वापरण्याऐवजी अनेकदा डाळीचा भरडा वापरला जातो .

५)      त्यासाठी डाळ रव्यापेक्षा थोडी जाडसर दळून आणली जाते .

 

पालकाची भरडा भाजी : palak recipes in marathi

 

साहित्य :-

१)      पालक एक जुडी

२)      तेल पाव वाटी

३)      तिखट पाऊण चमचा

४)      भरडा अर्धी वाटी

५)      फोडणीचं साहित्य

६)      चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      सर्वप्रथम हिंगाची फोडणी करून त्यात धुऊन चिरलेला पालक घालावा . 

२)      नंतर मीठ , तिखट घालून परतावं . 

३)      पालक शिजल्यावर त्यात भरडा टाकून भाजी चांगली हाटून घ्यावी आणि तीन-चार मिनिटं भाजीला मंद आचेवर वाफ येऊ दया .

 

ताकातली पालक भाजी :palak recipes in marathi

 

साहित्य :-

१)      पालक एक जुडी

२)      तिखट अर्धा चमचा

३)      आंबट ताक अर्धी वाटी

४)      अर्धा चमचा साखर

५)      सुक्या लाल मिरच्या पाच-सहा

६)      डाळीचं पीठ अर्धी वाटी

७)      तेल पाव वाटी

८)      फोडणीचं साहित्य , मीठ .

कृती :-

१)      हिंगाची फोडणी करून त्यात चिरलेला पालक टाकावं . 

२)      त्यात मीठ , तिखट आणि साखर टाकून भाजी परतावी .

३)      ताक आणि पाणी एकत्र करून यात डाळीचं पीठ एकजीव कालवून घ्यावं .

४)      भाजी शिजली की त्यात हे मिश्रण ओतून व्यवस्थित हलवून भाजीला उकळी आणावी .

५)      भाजी शिजल्यावर वरून सुक्या लाल मिरच्यांची खमंग फोडणी घालावी .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS