BREAKING NEWS

< >

paneer butter masala recipe in marathi

 

 
साहित्य: 

१५० ग्रॅम पनीर

३-४ टेबलस्पून बटर
२ मध्यम कांदे,बारीक चिरूलेले 
२ चमचे आलं-लसूण पेस्ट
५-६ तळलेले काजू
३ टोमॅटो
१/२ टीस्पून गरम मसाला
१ १/४ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरे पूड
१ टीस्पून लाल तिखट (बेडगी)
१ टीस्पून हळद
१ टीस्पून कसुरी मेथी, चुरडून
१/४ कप जाडसर क्रीम
मीठ आणि साखर चवीप्रमाणे


कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करून बटरवर मध्यम फ्राय करून घ्या.
२. टोमॅटोची जाड प्युरी करून ठेवा. 
३. कढईत २ टेबलस्पून बटर गरम करा. त्यातच १ चमचा तेल घाला. मग आलं-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परता. नंतर कांदा घालून शिजेपर्यंत परता.
४. कांदा शिजला कि, त्यात हळद,तिखट,गरम मसाला,धने-जिरे पूड आणि किंचित मीठ घालून छान वास सुटे पर्यंत परतून घ्या. गॅस बंद करा.
५. हे सगळे मिश्रण आणि तळलेले काजू एकत्र करून मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास पाणी न घालता थोडीशी टोमॅटो प्युरी घालून वाटा.
६. आता पुन्हा कढईत १ टेबलस्पून बटर गरम करा आणि वाटलेला कांदा आणि काजूची पेस्ट घालून २-३ मिनिटे परता.
७. मग टोमॅटो प्युरी,मीठ आणि साखर  घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवून ८-१० मिनिटे ग्रेवी  शिजवत ठेवा. कसुरी मेथी घाला आणि गॅस बंद करा.
८. पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.झाकण ठेवून ५-७ मिनिटांनी वरून क्रीम घाला आणि हलक्या हाताने एकत्र करा.
९.  वरून कोथिंबीर नी सजवा आणि पराठा किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.
 
Image Source : Facebook.com
 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS