BREAKING NEWS

< >

recipe in marathi language

 

दिलजमाई Unique recipe in marathi language

 

साहित्य :

पाव किलो हिरा बेसन , अर्धा किलो साखर, दीड वाटी पाणी , १ टेबलस्पून प्रत्येकी  काजू , बदाम,पिस्त काप , वेलचीपूड ,हिरवा केशरी ,गुलाबी द्रवरूप रंग  ४-५ थेंब प्रत्येकी , तेल तळण्यासाठी .

 

कृती:

पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून गार पाण्यात भिजवावे. भज्याच्या पिठासारखे  पण सरसरीत  भिजवावे.  चार भाग करून  एक तसाच ठेवून  उरलेल्यात तीन रंग घालावे . कढइत तेल तापवत ठेवून  नेहमीचा झारा कढईत  ठेवून  भांड्याने  पिठाची धार झाऱ्यावरून सोडावी . दुसऱ्या झाऱ्याने  काळ्या टाळून घ्याव्या . गोल काळी चांगली दिसते . त्यानुसार झारा व पीठाचे  भांडे याचे अंतर  कमीजास्त करावे. साखर पाणी एकत्रं करून  दोन तारी पाक करावा .त्यात सर्व सुकामेवा , वेलचीपूड व तळलेल्या  काळ्या घालाव्या . मधून मधून हलवावे. म्हणजे सर्व कळ्यांना  पाक नीट लागेल .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS