BREAKING NEWS

< >

recipes for breakfast

 

चीज डोसा : recipes for breakfast

 

साहित्य :-

१)      अर्धी वाटी उडीद डाळ

२)      दोन वाटया तांदूळ

३)      एक वाटी किसलेलं चीज

४)      एक चमचा लाल सुक्या मिरचीचा चुरा

५)      एक काळी मिरी जाडसर कुटून

६)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      डाळ व तांदूळ कमीतकमी सात-आठ तास एकत्र भिजत घालावं . 

२)      गुळगुळीत वाटून घ्यावं .  इडलीच्या पिठापेक्षा हे पीठ थोडं पातळ असलं तरी चालेल .  

३)      थोडं मीठ घालून , झाकून उबदार जागी फुगत ठेवावं .  सकाळी पीठ फुगलं की चांगलं ढवळून घ्यावं .  

४)      डोसा करतेवेळी पीठ पळीनं घोटून घ्यायचं .  गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं .  एका वाटीत तेल आणि दुसऱ्या वाटीत पाणी तयार ठेवायचं . 

५)      बीडचा तवा असेल तर तो तापल्यावर पेपर नैपकिनला तेल लावून तवा पुसून घ्यायचा .  मग तवा पुरेसा तापला , की नाही हे बघण्यासाठी त्यावर पाणी शिंपडायचं .  गैस मात्र मोठाच हवा . 

६)      पाणी झटकन वाफ होऊन नाहीस झालं , की एक डावभर पीठ मध्यभागी ओतायचं आणि डावाच्या तळानं किंवा वाटीच्या तळानं पीठ भराभर गोलाकार पसरायचं . 

७)      ही कृती सवयीनं भराभर करता येते .  बाजूनं तेल सोडायचं .  डोसा कुरकुरीत होतो .  दुसऱ्या बाजूनं करायची गरज नाही .  त्यानंतर प्रत्येक वेळी पाणी शिंपडायचं , पाणी नाहीस झालं की पीठ पसरायचं आणि तेल सोडायचं . 

८)      तव्यावर डोसा होत आल्यावर चीज पसरावं .  वर मिरपूड आणि मिरची पेरावी . 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS