BREAKING NEWS

< >

soups recipes

 

soups recipes

 

 

लेमन कॉरिएन्डर सुप

साहित्य:-

१ जुडी कोथिंबीरीचे देठ
३-४ इंच लांबीचे गवतीचहाचे दांडे २
१/२ इंच आले
१ मोठा टोमॅटो
१/२ लिंबू
चवीप्रमाणे मीठ, साखर, मिरीपूड
३ कप पाणी

कृती: -

गवतीचहाचे दांडे धुवुन बत्त्याने थोडे ठेचुन घ्यावेत. आले धुवुन त्याच्या चकत्या कराव्यात. टोमॅटो बारिक कापून घ्यावा. एका पातेल्यात पाणी घेउन तापायला ठेवावे. पाणी तापत आले की त्यात धुतलेले कोथिंबीरीचे दांडे, आले, गवती चहा, टोमॅटो घालावे. गॅस मध्यम करुन व्यवस्थीत उकळू द्यावे. ३ कप पाणी उकळून साधारण२.५ कप होईल इतपत उकळावे. पातेले गॅसवरुन उतरवून ते पाणी गाळून घ्यावे. गाळलेले पाणी परत एका पातेल्यात घालून गॅसवर ठेवावे. त्याच चवीप्रमाणे मीठ, साखर आणि मिरीपूड घालावी. भांडे खाली उतरवताना लिंबू पिळावे. गरम गरम प्यावे.

१. कोथिंबीर घालून पाणी उकळात असताना गाजराचा एखादा तुकडा बारीक चिरुन, एखादा फ्लॉवर, कोबीचा तुकडा घालता येईल. त्याने ब्रॉथ जास्त चविष्ट होईल.
२. सहजी मिळत असेल तर गलंगल हे थाई आले साध्या आल्याच्या ऐवजी वापरता येईल.
३. काफील लाईमची पाने मिळणे शक्य असेल तर ती वापरली तर त्याचा वास अप्रतीम येतो.
४. ब्रॉथ गाळून घेतल्यावर आवडत असेल तर गाजर, झुकीनी, टोमॅटोच्या मोठ्या फोडी या सुप मधे घालता येतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

soups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipessoups recipes

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS