BREAKING NEWS

< >

south indian recipies

 

सांबार मसालासाहित्य (सांबार): २ वाटया तुरीची डाळ, ४ वांगी, २ टोमॅटो, २ मोठे कांदे ( आवडत असल्यास
थोडा दुधी भोपळा, व तोंडली घ्यावीत), कोथिंबीर, लिंबाएवढी चिंच, मोठया लिंबाएवढा गूळ

साहित्य (सांबार मसाला): २ टीस्पून धणे, १ टीस्पून जिरे, २ टीस्पून चणाडाळ, १ टीस्पून उडीद डाळ,
२ लवंगा, २-३ तुकडे दालचिनी, ७-८ मिरीदाणे, १०-१२ मेथीदाणे

कृती: १ टीस्पून तेलात सर्व मसाले मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजावेत व थंड झाल्यावर
मिक्सरमध्ये कोरडे वाटावेत.
कांदा उभा चिरावा. वांगी व टोमॅटो मध्यम चिरावेत. कुकरमध्ये डाळ व सर्व भाज्या वेगवेगळे शिजवून घ्यावे.
पातेलीत १/२ टीस्पून तेल घालावे तेल तापल्यावर १/२ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हिंग व
१०-१२ कढीपत्त्याची फोडणी ध्यावी. त्यात शिजलेली डाळ घालावी व ४-५ वाटया पाणी घालून बेताची पातळ
करावी.नंतर त्यात शिजलेल्या भाज्या, कांदा, २ टीस्पून तिखट, थोडी हळद, लिंबाएवढी चिंच, मोठया लिंबाएवढा
गूळ, वाटलेला सांबार मसाला व कोथिंबीर घालावी. सांबार चांगले उकळवून गॅस बंद करावा.

टीप: वरील सांबार रेसिपी मध्ये ३-४ तुकडे शेवगाच्या शेंगा (डांबे) टाकूनही छान लागते.

 

 

चटणी प्रकार : १साहित्य: अर्धा नारळ, ४-५ हिरव्या मिरच्या, १ मुठ कोथिंबीर, सुपारीएवढी चिंच,
१/४ टीस्पून मीठ, १ टीस्पून साखर, २-३ लसूण पाकळ्या, १/२ टीस्पून जिरे

कृती: नारळ किसून त्यात वरील सर्व मसाले बारीक वाटावे व बेताचे पातळ करावे.
नंतर १ टीस्पून तेलात हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता व सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी
आणि चटणीत ओतावी.

 

 

चटणी प्रकार :२साहित्य: १ वाटी किसलेला ओला नारळ, ४-५ हिरव्या मिरच्या, १/४ इंच आले, १/२ टीस्पून चणाडाळ,
१/२ टीस्पून उडीद डाळ, पाव कांदा १/२ टीस्पून मीठ

कृती: थोडया तेलात चणाडाळ व उडीद डाळ भाजावी. नंतर त्यात कांदा, खोबरे, मिरची, आले घालून
सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटावे व चटणी बेताची पातळ करावी. नंतर १ टीस्पून तेलात हिंग, मोहरी,
जिरे व कढीपत्ता घालून फोडणी करावी व चटणीत ओतावी.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS