BREAKING NEWS

< >

veg kolhapuri recipe marathi language

 

बटाटयाची भाजी :veg kolhapuri recipe marathi language

 

साहित्य :-

१)      बटाटे चार , लाल टमाटा एक

२)      कांदा एक , लसूण एक

३)      खोबरं पाव वाटी

४)      धने एक चमचा

५)      तेल , चवीपुरतं मीठ

६)      कोथिंबीर अर्धी वाटी

७)      लाल मिरच्या सहा

८)      खडा किंवा गरम मसाला दोन चमचा

९)      आलं एक इंच

१०)   अर्धा लिटर गरम पाणी .

कृती :-

१)      बटाटे तीन पद्धतीनं भाजीत टाकता येतात – १) उकडून , सोलून , मोठे तुकडे करून २) कच्चे बटाटे सोलून त्याचे चौकोनी तुकडे करून ३) कच्चे बटाटे सोलून वेफर्ससारख्या खूप जाड गोल चकत्या करून .

२)      कांदा-खोबरं , धने , मिरच्या , खडा मसाला तव्यावर तेल टाकून क्रमाक्रमानं भाजून घ्यावं .

३)      भाजलेला मसाला , लसूण , आलं , थोडंसं पाणी टाकून मिक्सरवर          बारीक वाटून घ्यावं .

४)      फोडणीसाठी तेल कडक करून हळद , मसाला परतावा . 

५)      चांगला वास सुटल्यावर बटाटे , टमाटा टाकावा .  मीठ , कोथिंबीर ,        गरम पाणी टाकावं .

६)      कच्चे बटाटे असल्यास दहा मिनिटं व उकडलेले असल्यास पाच मिनिटं मंद आचेवर भाजी शिजू दयावी .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS