BREAKING NEWS

< >

veg pulao recipe in marathi

 

veg pulao recipe in marathi

 

कोफ्ता पुलाव

साहित्य: तांदूळ पाऊण किलो,खिमा ४०० ग्रॅम,काळे-मिरे १०-१२,पंढरपुरी डाळ २ चमचे,दही १ कप,मलई १ कप,हिरव्या मिरच्या ७-८,कांदा 1,बदाम,केवडाजल,तेल,खसखस २ चमचे ,हिरवी मिरची १,मसाला वेलची ,लवंगा,आलं,कांदे ४-५,लसूण,खोबरं पाव कप,पिस्ते मीठ,केशर

 

पूर्वतयारी:

 

खिमा स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावा. कांदे उभे पातळ चिरून लाल रंगावर तळून काढावेत.आलं-लसूण,मिरची बारीक वाटावी.

तांदूळही धुवून निथळत ठेवावा.तीन लवंगा,दोन मसाला वेलची,चार-पाच दाणे काळे-मिरे,पंढरपुरी डाळ,एक चमचा खसखस,एक चमचा किसलेलं खोबरं व अर्धा तळलेला कांदा हे सर्व बारीक वाटून घ्यावं व खिम्यात मिसळून त्याचे गोळे करावेत.उरलेला गरम मसाला कांदा,खसखस,खोब-याचं वाटण करावं.तेलात कोफ्ते तळून घ्यावेत.तांदूळ साधारण शिजवून घ्यावा व त्यातलं पाणी निथळू द्यावं.

 

कृती:

एका भांडयात तेल गरम करून त्यात आलं-लसूण,मिरची वाटण घालून एक सेकंद परतावी.

त्यात दुसरं वाटण घालून फेटलेलं दही घालावं. तेल सुटेपर्यंत परतावं.

मग त्यात फेसलेली साय घालावी. मीठ घालावं व तळलेले कोफ्ते घालून एक वाफ आणावी.

मसाला दाटसर असला पाहिजे. त्यात केशर घालावं.

जाड बुडाच्या भांडयात एक थर कोफ्त्याचा, तर एक थर भाताचा लावावा.

एक कप पाणी अधूनमधून शिंपडावं. सर्वात वर बदाम पिस्त्याचे काप, केशराचे धागे घालून झाकण लावावं.

झाकणाला कणीक भिजवून लावावी म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही व पुलाव दमपुख्त पध्द्तीने शिजेल.

वाढताना वरून तळलेला कांदा घालावा.

 

 

 

 

 

 

 

veg pulao recipe in marathiveg pulao recipe in marathiveg pulao recipe in marathiveg pulao recipe in marathiveg pulao recipe in marathiveg pulao recipe in marathiveg pulao recipe in marathiveg pulao recipe in marathi

 

 

 

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS