BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

मुलांना चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली तयार होऊ द्या - सुरेश तळवलकर

NEXT ARTICLE

आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आनंदाने सामोरे जायला हवे - आशा भोसले

हास्य हे मनुष्याला मिळालेले वरदान

Published: 2016-08-28 06:05 PM IST

 

  हास्य हे मनुष्याला मिळालेले वरदान असून मनुष्याने सतत हसले पाहिजे. यामुळे जीवनातील तणाव कमी होऊन जीवन सुंदर बनते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी येथे केले.

मसाप जुळे सोलापूर शाखेचा पाचवा वर्धापन दिन बुधवारी सायंकाळी जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ङ्कजीवनातील विनोदाचे स्थानङ्क या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सुशीला आबुटे होते. याप्रसंगी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, मसापचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, प्रा. ए. डी. जोशी, सायली जोशी, डॉ. वासुदेव रायते यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी पद्माकर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी सारिका आकुलवार यांना प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते स्व. सुनेत्रा श्रीनिवास कुमठेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये विनोदबुद्धी होती. एकमेकांवर ते विनोद करीत आणि सहजतेने घेत. पण आता तसे राहिले नाही. एखाद्यावर विनोद केला तर तो गंभीरतेने घेतला जातो. त्यातून अनेक प्रकार घडतात. वास्तविक विनोद करणे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यामुळे माणूस हसतो आणि अशामुळे माणसाचे जीवन बदलते. त्यामुळे हास्यासाठी एकमेकांवर विनोद केलाच पाहिजे. हास्य लोप पावणे हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. पूर्वी संतांनीही समाजमन समृद्ध करण्यासाठी आपल्या भजनातून, कीर्तनातून, प्रवचनातून हास्य फुलविण्यासाठी शब्दांचा प्रभावी वापर केला आहे. यावेळी जोशी यांनी राम गणेश गडकरी, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातील विविध विनोदी किस्से सांगितले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS