BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

अंतराळ स्थानक तयार करण्यास इस्त्रो सक्षम - ए.एस. किरण कुमार

NEXT ARTICLE

स्नॅपडीलचे सहसंस्थापक करणार आपल्या वेतनात १०० टक्के कपात

३१ मार्चनंतर जिओ तर्फे दरमहा ३०३ रु. मध्ये अमर्यादित डेटा

Published: 2017-02-21 05:50 PM IST

 

नवी दिल्ली, रिलायन्स जिओ ची मोफत सेवा ३१ मार्चपर्यंतच असून १ एप्रिलपासून ही सेवा वापरण्यासाठी नवे दर लागू केले जाणार असल्याची माहिती रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दिली. मोफत इंटरनेट सेवा जरी ३१ मार्चपर्यंतच मिळणार असली, तरी व्हॉर्इस कॉलिंग मात्र त्यानंतरही मोफत असणार असल्याचे अंबानी यांनी स्पष्ट केले. अंबानी यांनी मंगळवारी जिओच्या वाटचालीबाबत एका कार्यक्रमात माहिती दिली.

३१ मार्चनंतर जिओ च्या इंटरनेट वापराच्या डेटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, हा डेटा इतर मोबार्इल सेवा पुरवणा-यांपेक्षा तुलनेने २०टक्के स्वस्त असणार आहे. तसेच, ३१ मार्चनंतर प्रतिमहिना ३०३ रुपयांत जिओ चा अमर्यादित डेटा वापरण्यास मिळणार आहे, असेही अंबानी यांनी सांगितले.

१७० दिवसांत जिओ ने १० कोटी ग्राहकांचा पल्ला गाठला. प्रति सेकंदाला जिओ ने सात ग्राहक जोडले. जिओचे ग्राहक प्रति महिना १०० कोटी जीबीहून अधिक डेटा वापरतात. प्रति दिवस ३.३ कोटी जीबी एवढे इंटरनेट वापरले जाते. इंटरनेट वापरात भारत पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे असे सांगत त्यांनी ग्राहकांचे आभार मानले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS