
बंगळुरू, स्नॅपडील कंपनीतील आर्थिक अडचणींमुळे कंपनीचे सहसंस्थापक कुणाल बहल व रोहित बन्सल यांनी आपल्या वेतनात १०० टक्के कपात केली आहे. बहल व बन्सल यांनी आपल्या कर्मचा-यांना ईमेल पाठवून याबाबतची माहिती दिली आहे. आम्ही गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले. पुरेसा निधी उपलब्ध असूनही योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यास आम्ही अकार्यक्षम ठरलो. त्यामुळे वेतन कपातीचा निर्णय घेत असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी १० दिवसांपूर्वी संस्थापकांकडून कडक नियमावलीचे आदेश देणारा ईमेल कर्मचा-यांना पाठवण्यात आला होता. स्नॅपडील आपल्या ६०० कर्मचा-यांना कमी करण्याच्या तयारीत आहे. त्यात बल्कान एक्सप्रेस व फ्रीचार्जशी निगडीत कर्मचा-यांचा समावेश असेल. आम्ही दोघाांनीही १०० टक्के वेतन कपात केली असून काही वरिष्ठ अधिका-यांनीही आपलेही वेतन काही प्रमाणात कमी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे, असे ईमेलमध्ये लिहिण्यात आले आहे.
RELATED POSTS
मेट्रो ३ साठीच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाची बंदी कायम
25-02-2017
नव्या ग्रहांच्या स्वागतासाठी गुगलचे नवे डुडल !
24-02-2017
टेलिनॉर च्या भारतातील व्यवसायाची मालकी एअरटेल कडे…
23-02-2017
स्नॅपडीलचे सहसंस्थापक करणार आपल्या वेतनात १०० टक्के कपात
23-02-2017