BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

बालसाहित्यामुळे विचार प्रक्रिया वाढीस लागते : डॉ. सुरेश सावंत

जागतिकीकरणामुळे शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला : प्रा. देशमुख

Published: 2017-02-25 06:11 PM IST

 

सोलापूर, जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञानामध्ये अनेक सकारात्मक बदल घडले. त्याचबरोबर अन्य गोष्टींमध्येही बदल दिसून आहे. मात्र जागतिकीकरणानंतर शेती भकास झाली. जागतिकीकरणामुळे आपले उत्पादन बाहेर विक्रीला जाण्यापेक्षा बाहेरील उत्पादने आपल्याकडे आली. त्यामुळे आपला शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील शास्त्र शाखेचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. पी. डब्ल्यू. देशमुख यांनी केले. मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात जागतिकीकरणानंतर भारतीय शेतीचा विकास या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. 

यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार प्रमुख पाहुणे, संस्थेचे अध्यक्ष पी. एल. कोळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार म्हणाले की, शेती हा व्यवसाय आता तोट्यात आहे. शासनाची धोरणे आणि योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली, तर आपण शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो. विकसित देशाबरोबरीने उत्पादन घेऊन शेतीचा चांगल्या प्रकारे विकास साधता येईल.

शिवाजी विद्यापीठातील डॉ. एम. जी. जाधव यांनी जागतिकीकरणामध्ये शेतील अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेती ही अर्थव्यवहारावर प्रभाव टाकते. चर्चासत्राचा विषय शेतकरी आणि संशोधकांसाठी उपयोगी असल्याचे मत मांडले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते चर्चासत्रातील निबंध पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS