BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

नव्या ग्रहांच्या स्वागतासाठी गुगलचे नवे डुडल !

मेट्रो ३ साठीच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाची बंदी कायम

Published: 2017-02-25 07:58 PM IST

 

मुंबई,  मेट्रो ३ प्रकल्पासाठी वृक्षतोडी करण्याच्या प्रस्तावावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला.  या प्रकरणावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.  

मुंबईतल्या मेट्रो - ३ साठी सीप्झ, अंधेरी आणि  कुलाबा परिसरातील ५ हजार वृक्षतोडीचा प्रस्ताव आल्यानंतर वृक्ष तोडीची परवानगी देण्याआधी पालिकेने सर्वेक्षण केले होते का? याची माहिती पालिकेने द्यावी, असे आदेश यावेळी उच्च न्यायालयाने दिले. मेट्रो-३ साठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करत चर्चगेट रहिवाशी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS