मेक्सिको, ३ मार्च, : मेक्सिकन खुल्या टेनिस स्पर्धेत द्वितीय मानांकित राफेल नडाल आणि तृतीय मानांकित मरीन चिलीच यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत नडाल आणि चिलीच हे दोघे आमनेसामने असणार आहेत.
नडालने उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या योशिहितो निशीओका याचा ७-६ (२-७), ६-३ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये निशीओकाने नडालला चांगलीच झुंज दिली. अखेर टायब्रेकरमध्ये नडालने ७-२ने सेट जिंकला. तुलनेने दुसरा सेट मात्र नडालने सहज जिंकला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मरीन चिलीचला मात्र सामना जिंकण्यासाठी अजिबात परिश्रम करावे लागले नाही. अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनने सामन्यातून माघार घेतल्याने चिलीचला परस्पर उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला.
RELATED POSTS
अजिंक्य रहाणेला वगळ्याचा प्रश्नच येत नाही - अनिल कुंबळे
03-03-2017
न्यूझीलंडच्या संघात नीशम, पटेलचे पुनरागमन
03-03-2017
मेक्सिकन ओपन : नडाल, चिलीच उपांत्य फेरीत
03-03-2017
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार क्लार्कने बंगळुरूत चालवली रिक्षा
03-03-2017