बंगळुरू, २ मार्च, : भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिक कुंबळेने स्पष्ट केले. शनिवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर तो पत्रकारांशी बोलत होता.
करुण नायरने झळकावलेले त्रिशतक ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरी असली तरी गेल्या काही वर्षात रहाणेने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. संघाची बांधणी करताना याचाही विचार करणे आवश्यक असते.
पहिल्या कसोटीचा संघ दुसऱ्या कसोटीसाठी कायम असणार असल्याचे त्याने सांगितले. नायरचा संघात समावेश न झाल्याबाबत खंत आहे. आम्ही पाच गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे नायरला संघात स्थान देता आले नाही, असे त्याने स्पष्ट केले.
काही वेळा खेळाडूनी आपली चांगली कामगिरी करून दाखवलेली असताना त्यांना संघात स्थान मिळत नाही. संघ बांधणी आणि संयोजनामुळे एखाद्या खेळाडूला बाहेर रहावे लागणे, हे त्या संघाचे बलस्थान दर्शवते, असे कुंबळेने नमूद केले.
एखादी कसोटी जिंकण्यासाठी योग्य संयोजनाची आवश्यकता असते. चार गोलंदाजांसह खेळणे किंवा पाच गोलंदाजांची गरज असणे, हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. शेवटी सामना जिंकणे, हेच उद्दिष्ट असल्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेणे, आवश्यक असते, असे तो म्हणाला.
RELATED POSTS
अजिंक्य रहाणेला वगळ्याचा प्रश्नच येत नाही - अनिल कुंबळे
03-03-2017
न्यूझीलंडच्या संघात नीशम, पटेलचे पुनरागमन
03-03-2017
मेक्सिकन ओपन : नडाल, चिलीच उपांत्य फेरीत
03-03-2017
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार क्लार्कने बंगळुरूत चालवली रिक्षा
03-03-2017