BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी कॉंग्रेस उमेदवार देणार - संजय निरुपम

NEXT ARTICLE

औरंगाबादला स्मार्टबरोबरच सुरक्षित शहर करू - मुख्यमंत्री

नाशिक जिल्ह्यातून ७८४ टन द्राक्ष निर्यात

Published: 2017-03-03 07:16 PM IST

 

लासलगाव, २ मार्च,  : द्राक्ष हंगाम बहरात असून निर्यातक्षम द्राक्षाची मागणी युरोप,रशिया आदी ठिकाणी असल्याने यावर्षी आतापर्यंत २३.७१ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे असे असले तरी निर्यातक्षम द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्षनिर्यातदारांसाठी यंदाही द्राक्ष आंबटच आहे आतापर्यंत देशातून ४२ हजार १०४ टन द्राक्ष निर्यात झाल्याची माहिती अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगनदादा खापरे यांनी दिली. यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून ७८४ टन द्राक्ष निर्यात झाली आहे ३१७४ कंटेनर भरून हि द्राक्ष निर्यात झाली आहे.

यंदाच्या द्राक्ष हंगामात विशेषतः महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षाला सुरुवातीला १०० रु पेक्षा अधिक भाव मिळाला होता आता मात्र चिली हा देशही सध्या द्राक्ष निर्यात करीत असल्याने पांढरे द्राक्ष ५० ते ६० रु व काळी द्राक्ष ६० ते ७० रु सरासरी भावाने निर्यात होत आहे सुरुवातीला काही निर्यातदारांनि साखर कमी असूनही माल पाठवला परिणामी तेथील मार्केटमध्ये अपप्रचार होऊन आणि शिवाय चिलीचा माल स्पर्धेत असल्याने अवघ्या ३० दिवसात भाव निम्म्याने खाली आले युरोप मध्ये तरी भाव सरासरी टिकून आहे रशियात ते ४० रु पर्यंत खाली आले आहेत.

असे असले तरी मार्च अखेर पर्यंत चिलीचा माल संपेल आणि तापमान असेच वाढले तर मागणी वाढून भारतीय द्राक्षाला दरही चांगला मिळेल फक्त कोणतेही नैसर्गिक संकट या दरम्यान यायला नको असा आशावाद जगनदादा खापरे यांनी व्यक्त केला फक्त द्राक्ष उत्पादकांनी घाई न करता संयमाने घ्यावे ८ ते १० दिवसात मार्केट मध्ये पुन्हा तेजी येऊ शकेल. मागील वर्षी युरोप मध्ये ८४ हजार मे टन निर्यात झाली होती आताच्या घडीला ती ४२ हजार १०४ मे टन इतकी असून यंदाच्या हंगामात ती ९० हजार मे टन च्याही पुढे जाईल असा अंदाज खापरे यांनी व्यक्त केला साधारणतः युरोप बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक निर्यात रशिया मध्ये झाली आहे मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे ते म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीत तब्बल २५ % वाढ होण्याचा अंदाज आहे जिल्ह्यात जवळपास ५६ हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड झाली असल्याची नोंद आहे गेल्या हंगामात १ लाख ८ हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती त्यापैकी ७५ हजार टन द्राक्ष हे युरोपमध्ये आणि ३३ हजार टन द्राक्ष रशिया ,बांगलादेश,दुबई या देशात निर्यात करण्यात आले होते. गेल्या काही वर्षात प्रतिकूल हवामान ,अचानक झालेली गारपीट,निर्यात करताना २०१० मध्ये औषधाचा घटक निघाल्याने स्वीकारायला नकार दिल्याने झालेले नुकसान असे अनेक संघर्षमय प्रसंग पचसउनही जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादकांनी अनेक संकटांवर मात करीत मधुर,रसाळ द्राक्षांचे उत्पादन सुरूच ठेवले असल्याने गुणवत्ता असलेल्या नाशिकच्या द्राक्षांना निर्यातक्षम देशात मोठी मागणी आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS