BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

माजी जिल्हा परिषद सदस्यांचा आत्महत्त्येचा प्रयत्न

भिवंडीत रिक्षाचालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; आरोपी अटकेत

Published: 2017-03-03 07:55 PM IST

 

भिवंडी, ०२ मार्च   : भिवंडीत रिक्षाचालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

रिक्षाचालकाचे नाव शफिक शेख असून त्याने वाहतूक पोलीस रविकांत पाटील यांना मारहाण केली असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यात रविकांत पाटील हे जखमी झाले आहेत.

आरोपी शफिक शेख याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफिकला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

भिवंडी एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर शफिक याने रिक्षा आडवी उभी लावल्याने या दोघांमध्ये वाद झाल्यामुळे शफिक याने रविकांत यांना मारहाण केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS