BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

औषधी मेंदी

NEXT ARTICLE

बहुगुणी अद्रक

गुणकारी अंजीर

Published: 2015-04-26 07:24:00 IST

 

अंजीर शक्तिवर्धक असून पचनास जड पण शीतदायी आहे. सुक्या अंजिरामधील लोहामुळे आपले शरीर आणि जठर क्रियाशील बनते, परिणामत: भूक लागते. अंजीर पित्तविकार, वायुविकार आणि रक्तविकार दूर करते. अंजिराच्या रोजच्या सेवनाने मलावरोध नाहीसा होतो. अंजीर सकाळ-संध्याकाळ दुधात गरम करून खाल्ल्याने कफाचे प्रमाण कमी होते तसेच दम्याचा विकार नाहीसा होतो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठीही अंजीर उपयोगी पडते. घरामध्ये लहान बालकाने चुकून काचेचा तुकडा गिळला तर तत्काळ अंजिरे खाऊ घालावी. या उपायाने काचेचा तुकडा गुदद्वारावाटे बाहेर पडतो. अंजीर हृदयरोगावरही गुणकारी आहे. बहुगुणी अंजीर उपयुक्त आहे तसेच ते पचनास जडही आहे. त्यामुळे अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात दुखणे सुरू होते. म्हणून अंजीर खाताना योग्य प्रमाण लक्षात घ्यावे. जास्त पिकलेले अंजीर खाणे आरोग्यासाठी बाधक ठरते.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS