BREAKING NEWS

< >

संगणक साक्षरता काळाची गरज

Published: 2015-01-12 03:52:36 IST

 

आज संगणकाविना कुणाचेही पान हलत नाही. सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच क्षेत्रात  संगणकाचा वापर सुरु झाला आहे . संगणकाबरोबरच नवीन प्रगत तंत्रज्ञानाची माहिती.

                १९३४ मध्ये प्रो.हॉवर्ड आयकन यांनी 'आय.बी.एम' कंपनीच्या मदतीने पहिला संगणक तयार केला .तो संगणक आताच्या संगणकापेक्षा आकाराने खूप मोठा होता . व त्या संगणकास चालू होण्यास ३ मिनिटे लागत असत. मानवी जीवनात त्यामुळे क्रांती घडून आली .वैद्यकीय निदान करणे , कार्यालयातील कामे, अचूक कामे व कार्यक्षमतेने करणे , शास्त्रीय संबोधन करणे, सरकारी व अन्य दस्तऐवज जपून ठेवणे , कारखान्यातील उत्पादनावर नियंत्रण  ठेवणे , यंत्र मानव  दूरध्वनी , भ्रमणध्वनी अशा अनेक प्रकारचे  शोध लागल्याने माणसाला विकासाचे मार्ग खुले झाले आहेत . या सर्व सुविधांचा  समंजसपणे व नेटकेप्रमाणे वापर करायला  आहे. अशा  प्रकारची कामे करणे , संगणक  तंत्रज्ञानामुळे शक्य झाले .

            इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे  माहितीचे देवान घेवाण करणे  अत्यंत सोयीचे झाले आहे . विविध विषयांचा संबंधित संकेतस्थळे संगणकावर उपलब्ध झाल्याने विविध विषयाचे अद्ययावत माहिती  मिळविणे शक्य झाले आहे . या एकविसाव्या शतकाने आपल्याकडे माहितीचे युग आणले.संगणक आणि इंटरनेट यांनी आपल्या आयुष्यात लक्षणीय बदल घडवून  आणून माहितीचे काम, नोकरी  व्यवसायात करमणूक  आणि संदेश वहन यांची नेहमी यंत्रे उघड  आहेत .विज्ञान आणि तंत्रज्ञानाची साक्षरता किंवा संगणकाची साक्षरता  ज्ञानाच्या क्षेत्रात टिकून राहते .आणि व्यवसाय कारकीर्दीच्या  वर्गावर प्रगती करणे अत्यावश्यक बनले आहे .सध्याच्या विज्ञान युगात कायम संशोधन चालू असते . या संशोधनात संगणक मोठे सहाय्य करतो . या युगातील अंतराळ विज्ञानाला संगणकाचा आधार लाभला आहे . अंतराळ उपगृह सोडविण्यासाठी संगणकामुळे शक्य झाले आहे . हवामानाचा अंदाज, दूरदर्शनवरील चित्रदर्शन अशी कितीकाने सांगावे . या संगणकाची इंटरनेटसारख्या  चमत्काराने  तर जग जवळ आणण्याचे मदत होईल .इंटरनेटला मराठीत  'आंतरजाळ' असे म्हणतात . मध्यवर्ती कार्यकारी विभाग म्हणतात . आज कोणतेही क्षेत्र संगणकाच्या स्पर्शापासून दूर राहू शकत नाही .इतके या संगणकाचे महात्म्य वाढले आहे .एकविसावे शतक आहे 'ज्ञानयुग 'आहे. आणि याला ज्ञानयुगाचा  कळस म्हणजे संगणक . आज या संगणकाला अशक्य हा शब्द माहित नाही. एके काळी संगणक हि फक्त शास्त्रज्ञची मक्तेदारी होती .पण आज तो जनसामान्याचा सेवेकरी झाला आहे .आपण प्रवासाला निघतो तेव्हा प्रवासातील तिकिटाचे आरक्षण करतो . हे काम संगणक करतो .आपल्याला दर महिन्याला येणारी विजेची व दूरध्वनीची बिले, विम्याचा हप्ता भरण्याचा सूचना देणारी स्मरणपत्रे संगणक तयार करतो .संगणकाने सर्व कामे सोपी व सुलभ केली आहे शालांत परीक्षा आणि इतर निकाल आपण संगणकावर बघू शकतो . मोठमोठी पुस्तके, ग्रंथ  अगदी सहजगत्या  व चुटकीसरशी संगणकाच्या सहाय्याने छापले जातात . संगणकाचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये होतो .संगणक हे बहुउपयोगी यंत्र आहे. 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS