
आई या जीवनदायी शब्दाची जादू प्रत्येक बालकाच्या मनावर तो जन्माला आल्यापासून तर त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नेहमीच असते .
'आ ' म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर .
म्हणजेच आत्मा आणि ईश्वर यांचे मिलन ज्या ठिकाणी होते
तो महासंगम म्हणजे आई.
आई म्हणजे हृद्याची हाक, निशब्द जाग
आई म्हणजे गुंज अंतरीचे , नाव परमात्म्याचे.
आई म्हणजे नसे केवळ काया, तर ओंजळभर माया,
आई म्हणजे आभाळ सावली, दुधाळ माऊली.
आई म्हणजे गगन भरारी, पंढरीची वारी,
आई म्हणजे एक अक्षयगाण कर्णाचे दान .
आई म्हणजे खळाळता झरा समुद्राची लाट सारे विश्व जोडणारी आई सुंदरशी वाट.
सुख-आनंद,स्तुती-सुमन,आदर-मानसन्मान
जेव्हा अंगाबाहेर नाचतात तेव्हा अनेक साथीदार ,
साक्षीदार सोबत असतात पण जेव्हा अपमान ,दारिद्य,भूक ,
अवहेलना आणि दु:ख असते तेव्हा असते आईची फूस.
आई आपल्या लेकरांच्या सुखा-दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते .
''आई माझा गुरु, आई कल्पतरू '
असे म्हणतांना अतिशय आनंद होतो
आपल्या आयुष्याचा पहिला गुरु म्हणजे आई असते .
आई असते श्रावण अविश्व रिमझिमणारा
तप्त जीवाची तगमग सारी थांबवणारा
आई म्हणजे काय? मला एवढेच उमगले
एक दिवा जळणारा आणिक तळमळनारा.
RELATED POSTS
हुंडाबळी
25-03-2015
द्यानत (नित्तीमत्ता)
25-03-2015
आयुष्याच्या वळणावर…………
25-03-2015
माझी माय
25-03-2015