
अजिंठा गावापासून अजिंठा लेण्या ह्या ११ किलोमीटर अंतरावर आहे . इ.स.पूर्व २०० ते ६५० या काळातल्या त्या अजिंठा लेण्या कोरीव कामात व रंगीत भिंतीचित्रासाठी जग प्रसिध्द आहेत . इंग्रजी लष्करातील अधिकाऱ्यांना १८१९ साली या लेण्यांचा शोध लागला.एकूण ३० लेण्या आहेत व त्या सर्व लेण्या बौद्ध धर्मीय आहेत याच प्रमाणे कोरिवे काम असलेले बौद्ध मंदिरे, गुफा, बुद्धांच्या जीवनावर कोरलेले अनेक प्रसंग हे अतिशय आकर्षित व आश्चर्य करणारे आहेत .
औरंगाबाद अजिंठा ह्या रस्त्यावरून जातांना ह्या लेण्यांचे अतिशय विस्मरणीय असे दृश्य दिसून येते ह्या लेण्यांना भेट देण्यास ४ किलोमीटर पासून बस व्यवस्था केली असून इतर गाड्यांनी होणारे प्रदूषण हे टाळले जाते . येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटक निवास ,शासकीय विश्रामगृह व लॉज आहेत.
मार्ग : - जळगाव रेल्वे स्टेशन पासून 59 किलोमीटर अंतरावर . औरंगाबाद पासून ९९ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला .
RELATED POSTS
अजिंठा-वेरूळची लेणी
25-03-2015
किल्ले राजगड
25-03-2015
शिवनेरी
18-02-2015
सज्जनगड
11-02-2015