BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

अजिंठा लेणी

NEXT ARTICLE

तुळजापूर

इगतपुरी

Published: 2015-01-13 08:01:02 IST

 

इगतपुरी हे शहर  नाशिक जिल्ह्यापासून  ४५ किमी असलेले व मुंबई  ते आग्रा  महामार्गावर  वसले आहे. नैसर्गिक दृष्ट्या  सुंदर व सह्याद्रीच्या  डोंगर रांगांनी चहू बाजूंनी वेढलेले आहे  हे बघण्यासाठी व थंड  हवेचे ठिकाण  याच्या  आकर्षणाने हजारो पर्यटक  नेहमीच येतात .

                        जगप्रसिध्द असलेल्या विपश्यता विद्यापीठ केंद्र तसेच मुसळधार पडणारा पाऊस यामुळे कसारा घाट  व पसरलेली धुके  असे निसर्गरम्य  दृश्य  असलेले हे  इगतपुरी  जगभरात  प्रसिध्द झाले आहे .या गावातील  सर्व लोक एकमेकांच्या दु:खात  सु:खात सहभागी होतात .आगरी समाज ,दलित समाज ,मुस्लीम समाज ,कोकणी ,तेली,आदिवासी ,मराठा ,चांभार ,न्हावी,सुतार तसेच अनेक इतर  विविध जातींचे ,पंथांचे ,धर्माचे लोक  असले तरी  ते गुण्या गोविंदाने एकोप्याने राहतात.

                        येथे नाशिक जिल्ह्याच्या प्रवेश द्वाराजवळच घाटन देवीचे प्रसिध्द मंदिर आहे व ते जागृत स्थान मानले जाते  तसेच तेथे  नवरात्र  उत्साहाच्या वेळी  मोठी यात्रा भरते.या भागातील  महत्त्वाचे ठिकाण पीक हे भाताचे  असून तेथील लोक  ह्या पिकांवर  त्यांचे उदरनिर्वाह करतात  तसेच गावातील मोठे हॉटेल्स,महिंद्रा कंपनी व रेल्वेस्थानक हे तेथील  लोकांना रोजगार मिळवून देतात .  

मार्ग : - नाशिक पासून रेल्वे , बसेस आणि टेक्सी सेवा उपलब्ध आहे .

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS