BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

इगतपुरी

NEXT ARTICLE

भीमाशंकर

तुळजापूर

Published: 2015-01-13 08:27:22 IST

 

तुळजापूर हे गावं  'बालाघाट' रांगांच्या कड्या कपारीवर वसलेले आहे. तुळजा भवानी मातेचे हे स्थान आहे  तसेच साडेतीन पीठांपैकी आद्य पीठाचे स्थान आहे . ह्या देवीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी असे म्हटले जाते .

     छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षपणे दर्शन देऊन त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तालावर दिली होती. असे मानले जाते  व तसेच त्यांची कुलदेवताही आहे. त्याच प्रमाणे तुळजापूरातील घाट शिळा वरचे तुकाई देवीचे मंदिर ,अरण्य गोवर्धन मठ,कालभैरव मंदिर हे तुळजापूरचे महत्त्व वाढवतात . देवीच्या दर्शनाला  येणाऱ्या भक्तांसाठी व पर्यटकांसाठी येथे पर्यटक निवास,धर्मशाळा  तसेच खाजगी विश्रामगृहे देखील आहेत .

मार्ग : - सोलापूर पासून ४५ किमी अंतरावर तुळजापूर आहे .  उत्तर आणि पूर्व  कडून लातूर किवा  नागपूर मार्गे सोलापूरहून तुळजापूर पोहोचू शकता. रेल्वे आणि बसेस सेवा उपलब्ध आहे .

STAY IN TOUCH!

LATEST NEWS