BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

इन्स्टट इडली

NEXT ARTICLE

इन्स्टट रवा इडली (२)

इन्स्टट रवा इडली

Published: 2015-01-13 11:20:30 IST

 

साहित्य :-

  1. चार वाटया बारीक रवा
  2. फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल
  3. अर्धा चमचा जिरं
  4. मोहरी , हिंग
  5. एक चमचा उडीद डाळ
  6. सात-आठ कढीलिंबाची पानं बारीक चिरून
  7. हवं असल्यास हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे
  8. एक चमचा आल्याचे बारीक चिरलेले तुकडे
  9. दोन चमचे फ्रुटसॉल्ट
  10. दोन चमचे मीठ .  

कृती :-

  1. एका मोठया रुमालात रव्याची पुरचुंडी बांधून ती एखादया ताटलीवर ठेवून कुकरमध्ये कोरडीच वाफवावी .  
  2. गार झाल्यावर रवा मोकळा करून घ्यावा .  तेलाची फोडणी करून त्यात   मिरच्या , कढीलिंब , उडदाची डाळ , आल्याचे तुकडे घालून परतावे आणि      ती फोडणी , मीठ , फ्रुट सॉल्ट घालून मिश्रण चांगलं कालवावं .  डब्यात    भरून ठेवावं .  
  3. इडली करायच्या वेळी कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवावं .  इडलीपात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावू नये .  
  4. एक वाटी मिश्रण , एक वाटी आंबट दही भराभर फेसून एकत्र करावं आणि इडलीपात्रात घालून इडल्या उकडाव्या .  
  5. सहा-सात इडल्या होतात .  इडलीपत्राऐवजी एखादया पसरट लंगडीला तेलाचा  हात लावून त्यात पीठ ओतलं तरी नंतर ढोकळ्यासारख्या वडया पाडता येतात .  याच पिठात थोडं ताक घालून भिजवून उत्तप्पा करता येईल .  

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS