BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

इन्स्टट रवा इडली

NEXT ARTICLE

इन्स्टट गोड शिरा

इन्स्टट रवा इडली (२)

Published: 2015-01-13 11:36:02 IST

 

साहित्य :-

 1. दोन वाटया मध्यम रवा
 2. दोन वाटया दही
 3. चार-पाच हिरव्या मिरच्या
 4. आलं अर्धा इंच
 5. दहा-बारा कढीलिंबाची पानं
 6. चिरलेली कोथिंबीर
 7. एक मोठा चमचा साजूक तूप
 8. अर्धा चमचा खायचा सोडा
 9. चवीनुसार मीठ .  

कृती :-

 1. मिरची , आलं आणि कढीलिंबाची पानं मिक्सरमधून बारीक करावीत .  
 2. रव्यात हे वाटण तसंच दही , तूप , मीठ , कोथिंबीर आणि खायचा सोडा    घालून थलथलीत पीठ बनवावं .
 3. लगेच इडली साच्याला तेल लावून त्यात तयार केलेलं पीठ टाकावं .
 4. पंधरा मिनिटं वाफवावं .  याबरोबर वेगळी चटणी दयायची गरज नाही .  

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS