BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

पटणा

NEXT ARTICLE

लालकिल्ला

रामेश्वरम

Published: 2015-01-13 13:45:11 IST

 

रामेश्वरम हे चार धामांपैकी  एक महत्त्वाचे धाम आहे  हे भारताच्या दक्षिण भागात आहेत .रामेश्वर हे मंदीर जगातला सर्वात मोठा गाभारा  असलेले व ६ हेक्टर जागेत तयार असलेले मंदीर आहे. ह्या मंदिराच्या जवळच ज्योतिर्लिंगपण आहे ,त्या मंदिरात  फक्त  शिवलिंगाची स्थापना केली गेली होती . त्या बरोबर  देवीची मूर्ती स्थापित  न केल्याने त्याचे नाव नि:संगेश्वर नाव पडले.

                                 रामेश्वर मंदीर हे अतिशय सुंदर शिल्पकलेच प्रदर्शन करतात  याचे प्रवेशद्वार  ४० फुट उंच असून  २ ते ५  फुट उंच  व ८ फुट लांब असा वरंडा आहे .हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे श्रीराम यांनी रावणाशी युध्द करण्यासाठी श्रीलंकेत प्रवेशासाठी समुदावर रामसेतू बांधला,रामेश्वर  येथे भाविक लोक काशीला जाऊन तेथील गंगेचे पाणी आणून अर्पण करतात.

                                 तसेच तेथील देवीचे मंदीर,बावीस कुंड,बिल्लीराण तीर्थ,एकांत राम ,कोडन्ड स्वामी मंदीर,सिताकुंद,आदिसेतू हे इतर यात्रेच ठिकाण आहेत .रामेश्वर येथील समुद्रात निरनिराळ्या प्रकारच्या  कवड्या ,शंख शिंपले बघायला मिळतात . हे ठिकाण फक्त तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द नसून ते नैसर्गिक  सौंदर्य असलेले ठिकाण देखील आहे . रामेश्वर येथे जाण्यासाठी  मद्रास वरून रेल्वे असून  हा प्रवास फक्त  १२ तासाचा आहे त्यामुळे यात्रेकरू व पर्यटकांचा हा सोयीचा ठरतो.

RELATED POSTS

थेऊर

03-02-2015

STAY IN TOUCH!

LATEST NEWS