BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

बचत म्हणजे भविष्याचे स्थैर्य

NEXT ARTICLE

मानवता हाच खरा धर्म

बना उत्तम वाचक

Published: 2015-01-14 13:03:13 IST

 

उत्तम वाचक  असण ही देखील एक कला आहे.खर तर शालेय  शिक्षण संपल्यावर आपला वाचनाशी फारसा  संबंध राहत नाही .पण वाचण्याची कला जर तुम्ही आत्मसात केली तर तुमची योग्यातही वाढेल  आणि ज्ञानही.स्वामी विवेकानंद एका दिवसात संपूर्ण  पुस्तक वाचत असतं, आणि पुस्तकाच प्रत्येक पण त्यांना पाठ असे . तुम्ही स्वत:ला  अशी सवय  लावून घेणे योग्य ठरेल.

         समजा तुम्ही एखादे छानसे पुस्तक वाचले आणि तुम्हाला कुणी त्यातील आशय विचारला आणि तुम्हाला तो व्यवस्थितपणे समजून सांगता आला तर  तुम्ही उत्तम वाचक आहात .असे समजावे  आणि जर नाही जमल  तर वाचावं कसं हे आत्मसात करण्याची शिकण्याची तुम्हाला गरज आहे हे नक्की .वाचतांना कुठल्याही गोष्टीचा अर्थ,संदर्भ लक्षात घेणे आवश्यक वाचलेले संक्षिप्त करण्याची  कला प्रयत्नपूर्वक आत्मसात करावी लागते .वाचन हे केवळ ज्ञान गोळा करण्यासारखंच आहे .पण वाचनावर विचार करण्यानेच ते ज्ञान आपलेसे होऊ शकते .म्हणूनच वाचतांना तल्लीन होऊन वाचण्याची सवय स्वत:ला  लाऊन घेतल्याने फायदा होईल . यामुळे वाचनाला दिशा मिळते .मन एकाग्र होण्यास मदत मिळते . वाचलेल्या गोष्टींवर विचार केल्याने मनाचा  व्यायाम होतो .

         पुस्तक वाचण्यापूर्वी त्यामध्ये जर सारांश दिला असेल तर आधी तो वाचावा. यामुळे कमी वेळात  संपूर्ण  पुस्तकात दिलेली माहिती तुमच्या लक्षात येईल. पुस्तक  वाचल्याने वाचनाला वेग  वाढण्यास मदत होईल .त्याचबरोबर ग्रहण क्षमता वाढण्यासही  मदत होईल. उत्तम वाचक होण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ देण्याची गरज नाही .परंतु रोज काहीतरी वाचणे व ते जाणीवपूर्वक जोपासणे गरजेचे आहे .  

STAY IN TOUCH!

LATEST NEWS