BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

बना उत्तम वाचक

NEXT ARTICLE

श्रद्धेची तहान म्हणजे धर्म

मानवता हाच खरा धर्म

Published: 2015-01-14 13:23:38 IST

 

देवाने जीवसृष्टी तयार केली .त्यात मानव प्राणी सुद्धा बनवला. माणसाला बुद्धी दिली,भावना व्यक्त करण्यासाठी  भाषा दिली .मात्र हे इतर प्राण्यांना दिल नाही .पुढे माणूस समूहाने एकत्र राहू लागला .आणि त्या त्या प्रदेशानुसार  माणसाचे  नियम  वेगवेगळे झाले  आणि मग उदा. मुस्लीम ,ख्रिश्चन  असे धर्म सोयीसाठी  बनले.  सगळे धर्म चांगलेच आहेत , कोणताच धर्म दुसऱ्या धर्माविषयी चुकीचा विचार सांगत नाही पण तरीही नेहमी दोन धर्मांमध्ये भांडण होतात .या पार्श्वभूमीवर असा एखादा धर्म नाही का निर्माण होऊ शकत ,जेथे माणसे भांडण करणार नाही ,लढाया करणार नाही ,युध्द करणार नाही असा  धर्म  माझ्यामते मानव धर्म.सर्व धर्मातल्या  संतांनी मानवता धर्माचाच पुरस्कार केला आहे .आता मानवता धर्म म्हणजे  काय? तर माणुसकीचे  वर्तन म्हणजे  मानवता धर्म , जे जे मला हवे ते ते दुसऱ्याला देण म्हणजे माणुसकी .

गाडगे बाबांनी भुकेलेल्यांना अन्न दिल , तहानलेल्यांना पाणी पाजल,रोग्यांची सेवा केली ,धर्मशाळा बांधल्या . सावित्रीबाई फुले , महात्मा फुलेंनी  शाळा काढली  हे खरे मानवता  धर्माचे पाईक आहेत .आपणही आपल्या आयुष्यात  दुसऱ्यांच्या सुखासाठी ,आनंदासाठी , हितासाठी काही करू शकत असू तर आपणही मानवता धर्माच पाईक राहू .

हातातून फेकलेला दगड  १०० फुट दूर जातो ,बंदुकीतून निघालेली गोळी १००० फुट दूर जाते , परंतु एका गरिबाला दिलेला भाकरीचा तुकडा  स्वर्गाच्या दारापर्यंत जातो .

        कोणत्याही धर्मात  असा उल्लेख केलेला नाही  की फक्त आपलाच धर्म श्रेष्ठ  आहे आणि दुसऱ्यांचा नाही.सर्वात महत्त्वाचा  धर्म म्हणजे  मानवता धर्म .एकमेकांवर प्रेम ,एकमेकांना मदत करणे ,प्रत्येकाविषयी सहानुभूती ,आदर मनात बाळगणे, समोरच्याला कधीही तुच्छ न लेखणे, तो गरीब असो  की श्रीमंत असो , कोणत्याही  वर्णाचा असो ,कुठल्याही जाती धर्मातून आलेला असो , शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या  सबल असो ,मनुष्यावर  असो किंवा  कुठल्यातरी  प्राणी मात्रावर असो आपल्या मनात त्या  विषयी हाच खरा मानवता धर्म.

माणसाने आधी माणूस बनवा  एक माणूस म्हणून  स्वत:ची  काहीतरी ओळख   बनवावी .मग त्याने म्हणावं, मी अमुक धर्माचा आहे किंवा मी इतका श्रीमंत आहे किंवा इतका गरीब आहे ,मी ह्या जातीचा आहे ,किंवा ह्या कुळाचा आहे किंवा वगैरे वगैरे . जे काही असेल . सर्वात आधी  मनुष्याने स्वत:ला  बदलावं स्वत:तील गुणदोष स्वत:नेच  ओळखावा ,त्या गुणांचा योग्य ठिकाणी वापर करावा आणि दुर्गुणांना दूर काढून फेकावे . या ठिकाणी एक उदाहरण द्यावेसे वाटते .

   माणूस मारत असताना शरीराचे भाग खालील प्रमाणे बंद होतात .

डोळे: ३० मिनिट नंतर

मेंदू : १० मिनिट्स नंतर

पाय: ४ तासानंतर

त्वचा :५ दिवसानंतर

हृदय:त्याच क्षणाला बंद पडते .

हाडे : ३० दिवसानंतर .

पण,उभ्या आयुष्यात  जिंकलेली माने, मिळवलेलं प्रेम ,केलेली मदत मरणानंतर सुद्धा जिवंतच राहते .आणि यालाच  आपण मानवता धर्म असे म्हणतो .

   कोणताही  भेदाभेद मनात न ठेवता .प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करणे  हाच खरा मानवता धर्म आहे . या धर्मासमोर माणसाने तयार केलेली सर्व धर्म  फिके आहेत . हिंदू धर्मात तर एकच आहे परंतु जातीभेद  खूप आहेत .एकदा असच मी एका  मुस्लीम व्यक्तीला विचारले  की तुमच्या इस्लाम धर्मामध्ये  ही असेच आहे तर,त्या व्यक्तीने अतिशय छान उत्तर दिले  ते काय ते नीट ऐका तो व्यक्ती बोलला कि इस्लाम धर्मात नाही आहे पण मुस्लिमांमध्ये आहे .

क्षुल्लक कारणांवरून भांडत बसण्यापेक्षा मी श्रेष्ठ कि तू श्रेष्ठ  असा वाद घालत  बसण्यापेक्षा  प्रत्येक मनुष्याने स्वत:ला एक प्रश्न विचारायला हवा . की मी माणूस  म्हणून जन्माला  आल्यापासून इतरांसाठी काय काय केल आहे मग  ते कोणीही असो  आपले असो  की परके असो  कुठल्याही व्यक्तीसाठी मी माणूस म्हणून काय केले आहे . भिकाऱ्यांना आणि दानपेटीत दान केल्याशिवाय  इतर काही आठवत का आपल्याला ? मग ते काम छोट्यात छोटे असो कि मोठ्यात मोठे  असो ,तर उत्तर काय मिळेल .बोटावर  मोजण्या इतक्या व्यक्ती सोडल्या तर बऱ्याच लोकांकडे या प्रश्नाचे उत्तर देखील नसेल .इथे एक गोष्ट मला व्यक्त करावीशी वाटते की एकदा बसमध्ये प्रवास करताना एक मुलगा त्याचा अनुभव मला सांगत होता .''रोजच्या प्रमाणे बसमध्ये गर्दी होती . मी बसमध्ये चढलो  माझ्या मागोमाग एक म्हातारे आजोबा चढले बाला मला पुढे जाऊ दे असे म्हणताच मी त्यांना पुढे जाण्यास जागा दिली .एवढ्या गर्दीने  भरलेल्या बसमध्ये एकच जागा रिकामी होती  ती म्हणजे खिडकीजवळची सीट.आणि त्या सीटच्या बाजूच्या सीटवर एक तरुण मुलगी बसली होती .त्या आजोबांनी तिला त्या सीटवर बसायला सांगितले .आजोबा म्हणाले  पोरी सरकतेस का तिकडे मला बसू दे तिथे.ती मुलगी म्हणाली दिसत नाही का तुम्हाला त्या सीटवर पावसाचे पाणी पडलय ते की वयानुसार अक्कल पण गेली . हा सर्व प्रकार माझ्यासमोर घडत होता .तिने एवढ्या उद्धट भाषेत बोलल्यावर माझी तर सटकलीच पण मी त्या  मुलीला काही बोललो नाही  सरळ माझ्या खिशातून  रुमाल काढला ,ती सीट पुसून दिली .आणि त्यांना बसायला सांगितले .माझा हा सर्व प्रकार बघून तिला तिची लाज वाटली  असावी कारण  तिने लगेच  मान खाली घातली.आजोबा म्हणाले ,काय गरज होती पोरा इथे पुढेच उतरायचे  आहे.मी म्हणालो बाबा बसा हो उतरेपर्यंत बसा.काही लोकांना आहे ना! सुंदरतेचा मान असला तरी माणुसकी सुंदरतेपेक्षा मोठीच आहे .त्याने तिला न कळत टोमणा मारला तेवढ्यात ती त्याच्याकडे मान वर करून  रागाने बघायला  लागली . आजोबा म्हणाले ,बरं पोरा बसतो मी. ''अरे तुझ्यासारखा विचार सर्वांनी केला तर भल होईल रे तरुण पिढीच .खुश राहा बाळा.''  त्या मुलाची गोष्ट ऐकूण तात्पर्य एवढेच निघते की, एकमेकांना सहकार्य करायला शिका मग काय फरक पडतो .समोरचा व्यक्ती ओळखीचा आहे कि परका रक्ताच्या नात्यातला आहे की मानलेला .चांगले कर्म करा त्याचे फळ देव तुम्हाला नक्कीच देईल . शेवटी मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे.शेवटी एकच सांगावेसे वाटते कि,

                        मनुष्य प्राणी चंद्रावर गेला आहे . मंगळावर पोहोचला आहे .एवढेच नव्हे तर  वेगवेगळ्या सौरमालेत सजीवाला राहण्याजोगे नवीन एखादे घर म्हणजेच . एखादा ग्रह आहे का ? हे शोधतोय परंतु त्याच माणसाला आपल्या शेजारी कुणाचे  घर आहे हे देखील माहित नसते . मग त्या माणसाला  आपण  काय म्हणावे .तो प्रगती करतोय की कळत न कळत मानव धर्माची अधोगती करतोय

STAY IN TOUCH!

LATEST NEWS