BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

मानवता हाच खरा धर्म

NEXT ARTICLE

स्वप्नपूर्तीसाठी हवी परिश्रमाची तयारी

श्रद्धेची तहान म्हणजे धर्म

Published: 2015-01-14 13:39:38 IST

 

आज भारतीय लोकशाहीची साठी ओलांडून गेल्यावरही या देशाचे राजकीय चारित्र्य  आणि सामजिक आरोग्य चिंता करण्यासारखे आहे , स्वातंत्र्यपूर्व काळात सयाजीराव गायकवाड यांनी राज्य प्रशासन, सामाजिक सुधारणा आणि सक्तीच्या मोफत शिक्षणाने जे कार्य केले ते आजही हवे आहे .

                                       सयाजीरावांच्या एकूण कारकीर्दीचा विचार करता त्यांनी पारंपारिक धर्मकेंद्री विचारधारा आणि निधर्मी विज्ञाननिष्ठ यांची पोकळी भरून काढणारी  एक सम्यक राजनीती अंगिकारली . सहिष्णुता,परस्पर सहमती आणि विवेकाची धारणा  विकसित करण्यावर भर देणाऱ्या सुधारकाची भूमिका स्वीकारणारा राजा  असे त्यांच्या कारकिर्दीचे वर्णन करता येईल .

                                      ज्ञानप्राप्तीसाठी आणि जीवनाला स्फूर्ती मिळण्यासाठी माणसाला धर्म हवा असतो ; पण धर्मामुळे जर हे साध्य जर दुरापास्त होत असेल , त्यात अडसर निर्माण होत असेल , तर त्या धर्माचीच पूर्णघटना करायला हवी , असे मत सयाजीरावांनी मांडले आहे . धर्मचर्चेसाठी लोकांना समजणारी प्राकृत भाषा वापरली पाहिजे . सयाजीरावांच्या दृष्टीने ईश्वर हा लोकसत्ताक राज्यातल्या राजसारखाच आहे. आणि सेवेची भावना ज्यांच्याकडे आहे , तेच देवाचे सरदार-शिलेदार होण्यास पत्र आहे. किंबहुना उत्कृष्ट सेवक हा सर्वांहून मोठा असतो , ही खरी शिकवण आहे .

                                       माणसाला साधा, बलवान ,उदार,प्रशांत  असा धर्म हवा आहे . जीवाला लाभलेली वास्तविकतेची आणि श्रद्धेची तहान म्हणजे धर्म, अशी धर्माची  सुटसुटीत व्याख्या सयाजीरावांनी तयार केली आहे .स्वत:चा विसर  पडेल अशी हाक माणसाला असते . मायावादाला महत्तव देणाऱ्या धर्मातून अशी हक त्याला  कधीच ऐकू येत नाही . सामान्य माणसाला आपल्या भाकरीप्रमाणे धर्म ओळखीचा वाटला पाहिजे .सयाजीरावांना तर शास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि धर्मद्रष्टे हे सर्व परमेश्वराचे जोडीदारच वाटतात.

                                       धर्माचे स्वरूप भिन्न-भिन्न तरी  धर्म ही  वस्तू तत्वत: एकच आहे. त्यामुळे धर्माला आलेली ग्लानी दूर करायची असेल  तर त्यात  विश्वबंधुत्वाला मारक असणार्या गोष्टी दूर सारून  इष्ट त्या सुधारणा करायला हव्यात  अशी भूमिका  सयाजीरावांनी जागतिक धर्मपरिषदेच्या व्यासपीठावरून मांडली आहे.सार्वभौम भारताच्या राष्ट्रनिर्माणासाठी जातिभेदातील मूल्यांच्या राज्यघटनेचे स्वप्नच जणू त्यांच्या विचारात गर्भित आहे . 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS