BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

पनीर सॅन्डविच

NEXT ARTICLE

आलूचाट

ब्रेड पेटीस

Published: 2015-01-16 14:33:44 IST

 

साहित्य :-

 1. चार ब्रेडचे स्लाईस
 2. दोन मोठे चमचे सॉस
 3. एक चमचा शेंगदाण्याची चटणी
 4. लसणाची किंवा खोबऱ्याची चटणी
 5. तीन मोठे चमचे बेसन
 6. तळण्यासाठी तेल
 7. एक चमचा ओवा
 8. दोन चीज
 9. चवीपुरतं मीठ .  

कृती :-

 1. ब्रेडच्या कडा काढून घ्याव्या .  त्याच्या एका बाजूला तेलाचा अथवा         बटरचा हात लावावा .  
 2. त्यावर चटणी किंवा सॉस पसरून त्यावर चीज किसून घालावं .  
 3. नंतर दुसरा स्लाईस बटर लावून , सॉस लावून त्यावर सॅन्डविच करतो त्याप्रमाणे ठेवावा .  नंतर त्याचे बरोबर त्रिकोणी दोन तुकडे करून घ्यावे .
 4. आता बेसनाचं भज्यांसाठी करतो इतपत पीठ भिजवून त्यात हळद , ओवा व चवीपुरतं मीठ घालावं .  
 5. आधी केलेले त्रिकोणी सॅन्डविच त्या पिठात बुडवून तेलामध्ये तळून घ्यावे .   

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS