BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

फेसमास्क

NEXT ARTICLE

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या

वाढत्या वयात सौंदर्याची जाणीवपूर्वक काळजी

Published: 2015-01-30 08:28:19 IST

 

१) वाढत्या वयात चेहऱ्याची त्वचा सैलसर होऊ लागते .  त्वचेचा घट्टपणा कमी होऊ लागतो .  चेहऱ्यावर मोठया आकारात छिद्रे दिसू लागतात .  वयाच्या तीस वर्षानंतर तेलकट वा संमिश्र त्वचेवर छिद्रे दिसायला लागतात .  चांगल्या क्लिन्झरने त्वचा साफ करून टोनिंग केल्यास तेलकट त्वचेची छिद्रे कमी होतात .  

२) संत्री , मोसंबी आणि इतर केशरी लाल फळे , गाजरे , भोपळा , बीट , आंबे यांचा आहारात समावेश असावा .  आळशी बिया , अक्रोड इ. ओमेगा थ्री फ्याटी (Fatty) आम्लयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्यावा .  म्हणजे त्वचेवरील छिद्रे सुरकुत्या कमी होतील .  तैलग्रंथींच्या सभोवती कोलेजन ताठर होऊन छिद्राची जागा घट्ट होईल .  

३) ओठावर सारखी जीभ फिरवण्याची सवय बहुतेक लोकांना असते .  त्यामुळे ओठ काळसर पडू लागतात .  सूर्यप्रकाशात सारखे जाणे होत असल्यास त्यासाठी सन प्रोटेक्शन क्रीम लावावे .  जसे UVA व  UVB  अशा दोन्ही क्रिया देणारे संयुक्त क्रीम लावावे .  ओठांकरिता लीप बाम ज्यावर SPF १५ आहे असे विकत घेऊन लावावे .  

४) वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर काळे / तपकिरी डाग येऊ लागतात .  मिनरल पावडर फाउंडेशन लावल्यास डाग हलके दिसतात .  वारंवार चार ते पाच तासानंतर सनस्क्रीन लावावे .  हातांना Hand Lotion लावावे .  पर्समध्ये ट्यूब ठेवल्यास आधून मधून लावण्यास सोपे जाते .

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS