BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

सौंदर्य डोळ्यांचे

NEXT ARTICLE

वॅक्सिंग

काळजी हातापायांची

Published: 2015-02-05 07:58:21 IST

 

हात व पाय हे आपल्या शरीराचे नेहमीच उघडे राहणारे अवयव आहेत .  शरीराच्या अत्यंत उपयोगी अवयवांची काळजीही तशीच घेतली पाहिजे .  

१) घरच्या घरी Manicure व Padicureकरण्यासाठी एका टबमध्ये किंवा बादलीत कोमट पाणी घ्यावे .  त्यात सौम्य शाम्पू एक चमचाभर टाकावा .  
२) खोबऱ्याच्या तेलाचे पाच ते सहा थेंब टाकावे .  लिंबू कापून , प्युमिक स्टोन व रुमाल शिजरीच ठेवावा .  
३) हात व पाय क्रमाने पाण्यात पाच मिनिटे ठेवावे .  लिंबाच्या सालीने हात व पायाला घासावे .  पायांसाठी प्युमिक स्टोनचा वापरही करावा .  
४) हात व पाय स्वच्छ झाल्यावर रुमालाने टिपून त्यांना मॉइश्चरायझर लावावे .  

मऊ मुलायम हातासाठी :-

१) हात मऊ व मुलायम राहण्यासाठी झोपण्यापूर्वी हाताला बेबी ऑइल लावावे .  
२) लिंबाचा रस व ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा .  
३) थंड पाण्याने हात ओलसर करावे .  कणकेचा कोंडा दुधात मिसळून हाताला लावावा .  नंतर चोळून हात धुवावे .  मुलायम होतात .  

सुंदर कोपारांसाठी :-

१) हाताच्या कोपरांवर लिंबूरस चोळल्यास काळेपणा जातो .
२) ओटच्या पिठात लिंबूरस टाकून पंधरा मिनिटे लावावे .  
३) हाताच्या कोपरांवर बेबी ऑइलने मसाज करावा .  
४) चेहऱ्याला सनस्क्रीन/मॉइश्चरायझर लावताना हातांच्या कोपरांनाही चोळावे .  

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS