BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

शिखर शिंगणापूर

NEXT ARTICLE

शिवनेरी

सज्जनगड

Published: 2015-02-11 08:10:55 IST

 

सज्जनगड-याचे पूर्वीचे नाव परळी .त्याच्या आधीचे नाव अस्वलगड तो शिवाजी महाराजांनी सन  १६७३ साली जिंकला . राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज  येथे दीड महिना  विश्रांतीसाठी राहिले  होते . समर्थ रामदासस्वामी सन १९७६ ते १६८२  या काळात येथे  राहत होते . समर्थांच्या समाधीच्या  जागी पूर्वी खड्डा होता. तेथे समर्थांच्या आज्ञेवरून नंतर समाधी मंदिर बांधले गेले व त्यावर श्रीराम मंदिर बांधले गेले .तंजावरच्या एका अंध मूर्तीकाराने समर्थांच्या सूचनेनुसार बनविलेल्या  मूर्तीची स्थापना शेजघरात  समर्थांनी स्वत: केली व तेथे समर्थांचे ५ दिवसांनी निधन झाले . नंतर मूर्तीची स्थापना श्रीराम मंदिरात केली .शेजघरात समर्थांची गुप्ती ,दंडा,हंडा, शिवाजी महाराजांनी दिलेला मंचक इत्यादी  त्यांच्या वापरातील वस्तू  जतन करून ठेवल्या आहेत.

                                                                                                                    गडावर समर्थांचे शिष्य श्रीधरस्वामी यांनी वास्तव केलेली कुटी आहे .(संभाजी महाराज  दिलेरखानाकडून परत आल्यावर शिवाजी महाराजांनी  त्यांना समर्थांकडे  सज्जनगडावर  काही दिवस पाठविले होते. ही माहिती खरी नाही ) समर्थांनी   शिवाजी महाराजांना मला त्याला भेटायचे नाही असे कळविले होते. समर्थांचा मृत्यू २१/१/१६८१  रोजी झाला .तेथे  संभाजींची बांधलेली समाधी आहे .हल्ली गडाच्या पायथ्यापर्यंत  साताऱ्याहून एसटीची सेवा आहे . तेथून वर  छोट्या उंचीच्या १८४  पायऱ्या चढाव्या लागतात . वर भोजनाची  नि:शुल्क  सोय आहे व ज्याला इच्छा असेल  त्याला राहता पण येते .

STAY IN TOUCH!

LATEST NEWS