
भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी आहे .याचे क्षेत्रफळ ६५.३ चौ किमी आहे .या शहराला भारताचे मंदिर शहर असे मानतात .येथे सुमारे ५०० मंदिरे आहेत . त्यात शंकराचे ११ व्या शतकात बांधलेले गिरीराज मंदिर आहे.१० व्या शतकात बांधलेल्या मुक्तेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार दगडांच्या कमानीचे आहे आणि सर्वत्र उत्कृष्ठ शिल्पकला आहे . हा ओरिसाच्या वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे .येथे सर्वत्र फुले,प्राणी ,मानव यांच्या आकृती कोरलेल्या आहेत व याचा कळस निराळ्याच पद्धतीचा आहे .या वास्तूत मूर्ती नाही . या मंदिराच्या जवळच परशुरामेश्वर मंदिर आहे . हे शिवमंदिर ७ व्या शतकात उभारले आहे व अतिशय चांगल्या स्थितीत आहे . ह्यावर प्रेमी युगुलांची ,प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत .त्याच्या पलीकडे दक्षिणेस स्वरनजलेश्वर मंदिर आहे .त्याच्यात रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत .जवळच वैताळ मंदिर आहे .हे चामुंडा देवीचे मंदिर आहे .तेथून १५ किमी अंतरावर हिरापूर येथे योगिनी मंदिर आहे .भारतातील चार योगिनी मंदिरांपैकी हे एक आहे .यात काळ्या क्लोराईटमध्ये योगिनीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत .भुवनेश्वर येथे बुद्धधर्माचा प्रचार खूप आहे .
शहरापासून ८ किमी दक्षिणेस धाऊली या ठिकाणी अशोकाने खडकावर बुद्धधर्माच्या आज्ञा कोरलेल्या आहेत . ह्याच्या वर दगडात हत्ती कोरलेला आहे . ही अशोकाने बुद्धधर्म स्वीकारल्याची खून आहे . दगडात शिल्पकला केलेली असलेली असलेले हे सर्वात प्राचीन शिल्प असावे असे मानतात .धौलगिरी पर्वतावर कलिंग युद्ध झाले .नंतर येथे विश्वशांती स्तूप उभारलेला आहे .हा स्तूप INDO -JAPANESE यांच्या संयुक्त प्रकल्पाने उभारलेला आहे .ह्या टेकडीच्या पायथ्याशी एक नदी वाहते .भुवनेश्वरपासून ८ किमी अंतरावर खंडगिरी व उदयगिरी टेकड्यात दगड फोडून बनविलेल्या गुहा आहेत .येथील राणी गुंफा दोन मजल्याची आहे आणि तिचे खोदकाम सुशोभित आहे . हस्ती गुंफीत राजा खारवाला याच्या काळातील काळक्रमनानुसार घडलेला वृत्तांत कोरलेला आहे . थोड्याच अंतरावर पुरीच्या दिशेला शिशुपालगड ही जुनी नगरी उत्खननात सापडली आहे. तिच्या भोवती खंदक आहे .दुसऱ्या शतकात ही कलिंग राज्याची राजधानी असावी .
RELATED POSTS
भुवनेश्वर
03-03-2015
थेऊर
03-02-2015
केदारनाथ
02-02-2015
महेश्वर
31-01-2015