BREAKING NEWS

< >

marathi veg recipes

 

 भरलेल्या मिरच्या : Marathi Veg Recipes

 

साहित्य :-

१)      छोटी सिमला मिरची पाव किलो

२)      हरभरा डाळीचं पीठ एक वाटी

३)      दीड चमचा ओवा

४)      भरपूर कोथिंबीर

५)      पाव वाटी तेल

६)      मोहरी , हिंग , हळद , तिखट , चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      सिमला मिरच्या धुवून त्या निथळल्यावर त्याच्या समोरच्या मोठया पसरट भागावर + असा छेद घ्यावा .

२)      आतल्या बिया काढून टाकाव्यात .  कढईत दोन मोठे चमचे तेल तापवून त्यात एक वाटी डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यावं . 

३)      ते थोडसं गार होऊ द्यावं .  नंतर त्यात हळद , तिखट , मीठ ओवा , कोथिंबीर घालावी व हे सारण मिरचीत भरावं .

४)      कढई , प्रेशरपैन किंवा पसरट भांड्यात उरलेलं तेल टाकून फोडणी करावी . 

५)      त्यात मिरचीची भरलेली बाजू वरती असेल व देठाकडील बाजू खाली असेल  अशा पद्धतीनं मिरच्या रचाव्यात आणि न हलवता मंद आचेवर भांड्यावर झाकण ठेवून व झाकणावर पाणी घालून शिजू द्याव्यात . 

६)      प्रेशर पैनमध्ये ही भाजी करताना पाणी अजिबात घालू नये .  मंद आचेवर पाच मिनिटात भाजी शिजवावी .

७)      झाकण ठेवल्यास उरलेल्या उष्णतेवर भाजी व्यवस्थित शिजते .

८)      पश्चिम महाराष्ट्रात ही भाजी करताना मिरच्यांचे दोन तुकडे करतात .  बटाटा वड्यासारखं बटाट्याचं सारण त्यात भरतात .  दोन्ही पद्धतीच्या भाज्या चविष्ट लागतात .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS