BREAKING NEWS

< >

marathi menu recipes

 

कारल्याची कोरडी भाजी

 

साहित्य :-

१)      कारली पाव किलो

२)      तेल सहा चमचे

३)      कढीपत्त्याची पानं आठ-दहा

४)      तिखट अर्धा चमचा

५)      साखर एक चमचा

६)      शेंगदाण्याचा कूट एक चमचा

७)      काळा मसाला अर्धा चमचा

८)      फोडणीचं साहित्य , चवीपुरत मीठ .

कृती :-

१)      कारली धुऊन सालकाढ्यानं त्याचा वरचा खरखरीत भाग काढून टाकावा .

२)      नंतर त्याचे पातळ कप करून त्यातल्या बिया काढून टाकाव्या .

३)      कारल्याच्या कापांना हळद आणि मीठ लावून पाच ते सहा मिनिटं ठेवावं . 

४)      नंतर फोडींना सुटलेलं पाणी फोडी दाबून काढून टाकावं .

५)      फोडणी करून त्यात हळद आणि कारल्याचे काप टाकून एक वाफ आणावी .

६)      फोडी मऊ झाल्यावर त्यात तिखट , मीठ , काळा मसाला , शेंगदाण्याचा कूट , साखर टाकून हलवावं आणि मंद आचेवर वाफ आणावी .

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS