चिकन तंगडी कबाब
साहित्य :-
१) चार पुढचे चिकन लेग्ज
२) एक अंडे , बटरचा चुरा
३) आले अर्धा इंच
४) चार ते पाच लसूण पाकळ्या
५) दोन मिरच्या , एक वाटी कोथिंबीर
६) तळण्यासाठी तेल
७) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) चिकन लेग्ज धुऊन त्याला थोडयाशा चिरा पाडाव्यात . चिरा पडून झाल्यावर त्यास मीठ लावून थोडा वेळ ठेवावे .
२) लसूण पाकळ्या , मिरच्या , एक इंच आल्याचा तुकडा व एक वाटी कोथिंबीर एकत्र वाटून चिकन लेग्जला लावून ठेवावेत .
३) अंडे फेसून त्यात एक-एक चिकन लेग्ज बुडवून बटरच्या चुऱ्यात घोळून ठेवावे व दहा मिनिटांनी भरपूर तेलात तळून घेऊन ब्राऊन पेपरवर काढावेत .
४) ऐल्युमिनियम फाईलचा तुकडा चिकन लेग्जच्या टोकाला गुंडाळून खाण्यास दयावे . उत्तम स्वादासाठी सॉसबरोबर खावे .
RELATED POSTS
chinese recipes
chinese food recipes
chinese non veg recipes
indian chinese recipes
veg chinese recipes
chinese cooking recipes
recipes chinese
easy chinese recipes
chinese dishes recipes
recipes of chinese