maharashtrian recipe
रव्याची साटोरी(Rawyachi satori)
साहित्य:
१) २ वाटी बारीक रवा, २ वाट्या चिरून गुळ ,
२) १ वाटी खोबरे कीस, अर्धी वाटी खसखस , वेलचीपूड ,
३) १ वाटी दुध , ४ वाट्या कणिक ,
४) मोहनासाठी ४ टेबलस्पून तेल , साजूक तूप तळण्यासाठी,
५) रवा भाजण्यासाठी अर्धी वाटी तूप .
कृती:
१) तुपावर खवा खमंग भाजावा . त्यावर गरम दुध ओतावे .
२) चांगले ढवळून बाजूला ठेवावे . खसखस, खोबरे भाजून कुटावे
३) रव्यात वेलचीपूड , गुळ ,खसखस , खोबऱ्याचे कुट सर्व घालून एकजीव करावे.
४) कणकेत मोहन घालून घट्ट भिजवावी .
५) सारखे गोळे करून सारण भरून जाडसर साटोरी तांदूळपिठी वर लाटावी .
६) तव्यावर प्रथम शेकून गार करावी . तूप सोडून गुय्लाबी भाजावी .
७)अशाच प्रकारे रव्याचा सांजा गुळ घालून करावा . त्याची वरीलप्रमाणे साटोरी करावी .
८) ह्या साटोऱ्या पातळ लाटून पोळी (पुरणपोळी प्रमाणे )करून भाजावी .
त्याला सांज्याच्या पोळ्या किंवा सांजोऱ्या म्हणतात .
RELATED POSTS
maharashtrian recipes in marathi
maharashtrian recipes
maharashtrian food
maharashtrian recepies
maharashtrian recipies
maharashtrian non veg recipes in marathi
maharashtrian recipe
maharashtrian recipe in marathi
recipe maharashtrian dishes
indian maharashtrian recipes