BREAKING NEWS

< >

marathi kavita poem

 

कहाणी....

लिहित होतो कहाणी....
लिहित होतो कहाणी
एका राजाची
त्याच्या प्रेमाची
हो माझ्या स्वतःची..

प्रेमाच्या कहाणीत
नेहमी राजा-राणी
पात्र जूनी असली
तरी नवी ही कहाणी..

नवी नव्या रंगाने
सजली माझ्या प्रेमाने
नवी नव्या फुलाने
फुलली माझ्या प्रेमाने..

पहिल्याचं भेटीत ती
हृदयात शिरली
असं वाटलं जणु
माझ्या करताचं घडवली..

मनं जवळ आले
जुळले का नाही
तीने मला विसरलं
पण मी..मी विसरलो नाही..

आजही तिच्याचं
आठवणीत जगतो
गर्दित ही देखिल
एकटाचं असतो..

संध्याकाळी तिची
आतुरतिने वाट पाहतो
प्रेमाच्या कहाणीची
गोड हळवार शोधतो..

माझी कहाणी अधूरी
होणार का कधी पूरी..?
हळूचं पावलाने पुन्हा
प्रेम शिरणार का उरी..?

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS