BREAKING NEWS

< >

marathi poems

 

marathi poems

माणूस, माणूस म्हणून वागणे विसरला 

माणूस, माणूस म्हणून वागणे विसरला 
स्त्री पुढे त्याचा पाय मागे पडला 
अन तू  माणूस म्हणून वागणे विसरला...... 
 
साडीच्या देशात, बाई jeans  मध्ये वावरली 
तर लोकांना वाटते भारतीय संस्कृती हरवली
आजही स्त्रीच  आहे रे पुरुषाची वाली 
तीच आहे मेनका अन तीच आहे काली
अरे तूच आज मानसिक रोगी झाला 
माणूस, माणूस म्हणून वागणे विसरला.....

चुलीपुरती मर्यादित  ती, आज चंद्रावर पोहोचली 
यश शिखराकडे तिने पाऊले रचली 
माणसाच्या त्रासाने ती त्रस्त झाली
तरी नारी ती मागे नाही वळली
अरे तूच अनिष्ठ रूढीत अडकला 
माणूस, माणूस म्हणून वागणे विसरला.....  

तुझासाठी western  culture ,तीला मात्र बदनाम केली  
या जगाची तीच आज राणी झाली 
अरे माणसा तुला तिची किंमत नाही कळली 
तरीहि तुझासाठी ती आई बहिण बायको मुलगी झाली
तूच नराधमा तिचा आडवा आला 
माणूस, माणूस म्हणून वागणे विसरला.....  

तूच झाला रावण , अन कंस होऊन मारहाण केली 
रामाच्या युगात सितेनेच अग्निपरीक्षा दिली 
शिवाजीला घडवणारी आई जिजाऊ झाली 
ब्रिटीशांमुळे राणी झाशी घडली 
अरे तूच  या कलयुगात क्रूर झाला 
माणूस, माणूस म्हणून वागणे विसरला .....

माणूस, माणूस म्हणून वागणे विसरला 
स्त्री पुढे त्याचा पाय मागे पडला 
अन तू  माणूस म्हणून वागणे विसरला.....

 

 

 

marathi poems

marathi poems

marathi poems

marathi poems

marathi poems

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS